या पाच सवयी असणाऱ्या मुलांना मुली अजिबात पसंत करत नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 05:59 PM2018-03-20T17:59:55+5:302018-03-20T18:31:23+5:30
फिटनेसकडे व हेल्थी जीवशैलीकडे जास्त लक्ष देण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.
मुंबई- फिटनेसकडे जास्त लक्ष देणाऱ्या मुलांना मुली जास्त पसंत करतात. पण अनेकता व्यस्त वेळापत्रकामुळे मुलांना फिटनेसकडे लक्ष देणं शक्य होत नाही. मुलांची हीच सवय अनेकदा मुली दुर्लक्षित करू शकत नाही. पार्टनर नेहमी फिट- हेल्थी असावा असं प्रत्येक मुलीला वाटतं. म्हणूनच मुलांनी त्यांच्या फिटनेसकडे व हेल्थी जीवशैलीकडे जास्त लक्ष देण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. जयपूरच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ.अनामिका पापडीवाल यांच्या मते, मुलांच्या अशा काही आरोग्याशी संबंधित गोष्टी आहेत ज्या मुलींना पसंत नाहीत. त्यामुळे त्या सवयी मुलांनी योग्यवेळी बदलणं गरजेचं आहे.
डॉ. अनामिका यांनी सांगितलेल्या या पाच आरोग्याच्या तक्रारी ज्या मुलींना अजिबात पसंत नाहीत.
1- पोटाचा घेर जास्त असणारी मुलं
ज्या मुलांचा पोटाचा घेर जास्त असतो किंवा जी मुलं आळशी असतात, अशांना मुली पसंत करत नाहीत.
2- झोपताना घोरणारी मुलं
मुलांची झोपताना घोरण्याची सवय मुलींना जराही आवडत नाही. त्यामुळे जी मुलं झोपताना घोरतात त्यांना मुली पसंत करत नाहीत.
3- शरीरातून दुर्गंध येणारी मुलं-
जी मुलं शरीराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात व ज्यांच्या शरीरातून उग्र वास येतो, अशा सवयी मुलींना आवडत नाहीत.
4- पिवळे दात असणारी मुलं-
ज्या मुलांचे दात पिवळे असतात अशा मुलांना मुली कमी पसंत करतात. चमकदार, स्वच्छ व मजबूत दात असणारी मुलं मुलींच्या जास्त पसंतीस उतरतात.
5- खराब केस असणारे-
जी मुलं केसांची काळजी घेत नाहीत किंवा ज्यांच्या केसात कोंडा व केस गळण्याचा त्रास असतो, अशा मुलांना मुली कमी पसंत करतात.