'या' 5 कारणांमुळे तरूणाईला येतोय पब्सचा कंटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 06:33 PM2018-04-25T18:33:55+5:302018-04-25T18:33:55+5:30
आजकालच्या तरूणाईचा विकेन्डला पब्समध्ये जाण्याचा अट्टाहास आता कमी होऊ लागला आहे. अनावश्यक खर्च तसंच पार्टीनंतर होणाऱ्या त्रासामुळे सर्वांना घरीच राहणं आवडतंय.
आधुनिक संस्कृतीला आपण कितीही आपलंसं केलं असलं तरी, काही तरूणांना घरीच मनोरंजनाचे पर्याय शोधणं आवडतंय. मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर न जाता स्वत:ला वेळ देणं व वैयक्तिक आयुष्य सुखी करणं याकडे तरूणांचा कल दिसतो. म्हणून अजूनही तरूणांना पब्स, डिस्को व नाईटआऊट का पसंत नाही याची कारणे पाहुया.
१) शांततेत वेळ घालवणं - आजकालच्या तरूणांना पब्स आणि डिस्कोमध्ये मोठ्या आवाजात वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांपेक्षा इयरफोन्स कानात घालून शांततेत गाणी ऐकायला आवडतात.
२) पार्टीतून परतल्यावर होणारा त्रास - रात्रभर जागून पार्टी करण्यापेक्षा सकाळी उठून व्यायाम करणं व फिटनेसकडे लक्ष देणं मुलींना महत्वाचं वाटतं. त्यामुळे आरोग्यही निरोगी राहतं.
३) अनोळखी व्यक्तींशी नको असलेले संबंध - पब्स व डिस्कोमध्ये अनोळखी व्यक्तींसोबत ओळख होते. त्यातून नशेच्या आधीन जाऊन विविध परिणामांना सामोरं जावं लागतं. म्हणून बऱ्याचदा पार्टी करण्याकडे पाठ फिरवली जाते.
४) पैशाची बचत- पब्समध्ये अनियमित व अनावश्यक पैसा खर्च होतो. तसंच या पैशाचा वापर वेगळ्या पद्धतीने चांगल्या कामासाठीही करता येईल, असं तरूणांचं म्हणणं आहे.
५) झोप महत्वाची - नोकरदार वर्गाला स्वत:च्या कामानंतर पुरेशी झोप घेणं महत्वाचं वाटतं. तसंच तरूणांना ताणतणावामुळे पुरेशी झोप मिळत नाही. त्यामुळे विकेन्ड आरामात घालवावा असं वाटतं.