काय करतात देशातील श्रीमंत उद्योगपतींच्या ग्लॅमरस मुली?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 12:07 PM2018-03-29T12:07:04+5:302018-03-29T12:07:04+5:30
देशातील उद्योगपतींच्या मुली कोणत्याही सेलिब्रिटींपेक्षा कमी नसतात. त्यामुळे त्यांच्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते.
देशातील अरबपती उद्योजकांबद्दल तुम्हाला बरीच माहिती असेल, पण त्यांच्या मुली काय करतात? कुठे शिकतात? कुठे राहतात? हे क्वचितच कुणाला माहिती असेल. देशातील उद्योगपतींच्या मुली कोणत्याही सेलिब्रिटींपेक्षा कमी नसतात. त्यामुळे त्यांच्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते. चला जाणून घेऊया देशातील अशाच काही मोठ्या उद्योगपतींच्या मुलींबाबत....
ईशा अंबानी -
26 वर्षीय ईशा ही देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी आहे. ईशा तिचा भाऊ आकाश अंबानीसोबत रिलायन्स जिओ प्रोजेक्ट सांभाळते. 2008 मध्ये 16 वर्षांची असताना ईशा फोर्ब्सच्या यादीत नाव आल्याने चर्चेत आली होती. 2015 मध्ये आशियातील भविष्यातील 12 शक्तीशाली महिलांच्या यादीतही ईशाचं नाव होतं.
अनन्या बिरला -
23 वर्षीय अनन्या उद्योगपती कुमार मंगलम आणि नीरजा बिरला यांची मुलगी आहे. एक बिझनेस मार्गदर्शक असण्यासोबतच ती एक सिंगर सुध्दा आहे. अनन्याची एक स्वतंत्र प्रायव्हेट लिमिटेड नावाची मायक्रो फायनान्स कंपनी आहे. अनन्याचा हा बिझनेस 2 राज्यांमध्ये सुरू आहे.
नव्या नवेली नंदा -
21 वर्षीय नव्या एस्कॉर्टस ग्रुपचे एमडी निखिल नंदा आणि श्र्वेता बच्चन यांची मुलगी आहे. ती आपल्या ग्लॅमरस लाईफस्टाईलसाठी चांगलीच लोकप्रिय आहे. ती तिच्या सोशल मीडियातील पोस्टमुळे चांगलीच चर्चेत असते.
यशस्विनी जिंदल -
जिंदल स्टील अॅन्ड पॉवरचे चेअरमन नवीन आणि शालू जिंदल यांची मुलगी यशस्विनी एक प्रशिक्षित कुचीपुडी डान्सर आहे. अनेक शो तिने केले आहेत. कथ्थक डान्समध्ये तिने अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल मिळवले आहेत.
मानसी किर्लोस्कर -
मानसी ही इंडस्ट्रियलिस्ट विक्रम आणि गीतांजली किर्लोस्कर यांची मुलगी आहे. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर सिस्टमचे चेअरमन आहेत. मानसी तशी मीडियापासून लांबच असते.