Earth Day Special : पर्यावरणाप्रति आपली जबाबदारी ओळखा; सुजाण नागरिक बना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 01:23 PM2019-04-22T13:23:29+5:302019-04-22T13:27:23+5:30
22 एप्रिलला जगभरामध्ये जागतिक वसुंधरा दिवस (World Earth Day) म्हणून साजरा करण्यात येतो. प्रदूषणामुळे जगभरामध्ये वाढणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानि होत आहे.
(Image Credit : theamgraphgroup.com)
22 एप्रिलला जगभरामध्ये जागतिक वसुंधरा दिवस (World Earth Day) म्हणून साजरा करण्यात येतो. प्रदूषणामुळे जगभरामध्ये वाढणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानि होत आहे. अशातच पर्यावरण रक्षणासाठी आणि वसुंधरेला सुंदर ठेवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकानेच प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यामुळे लहान लहान गोष्टीं लक्षात घेऊन आपण पृथ्वीच्या रक्षणासाठी मदत करू शकतो. त्यासाठी फक्त काही गोष्टी आपल्या आचरणात आणणं गरजेचं असतं.
(Image Credit : allperfectstories.com)
पाणी वाचवा
- ब्रश करताना, चेहरा आणि हात स्वच्छ करताना जास्त पाणी वायू घालवू नका.
- बाथ टब किंवा शॉवरखाली आंघोळ करण्याऐवजी बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करा. त्यामुळए पाणी वाया जाणार नाही.
- शॉवरचा वापर करून आंघोळ करण्याची इच्छा असेल तर कमी वेळ आंघोळ करा. कारण शॉवरचा वापर करताना एका मिनिटामध्ये साधारणतः 4 ते 5 लीटर पाणी वाहून जातं.
- टबमध्ये आंघोळ करणार असाल तर ते पाणी वाया जाऊ देऊ नका. त्या पाण्याचा वापर झाडांसाठी करा.
(Image Credit : fifthplay-blog)
वीज वाचवा
- जेवढं शक्य असेल तेवडा नैसर्गिक लाइटचा वापर करा. गरज असेल तेव्हाच ट्यूब लाइटचा वापर करा.
- घरामध्ये एलईडी लाइट्स लवा. यामुळे 80 ते 90 टक्के वीजेची बचत होते.
- खोलीतून बाहेर जाताना लाइट, पंखा आणि एसी बंद करा.
- वीजेचे सर्व अप्लायंस स्विच ऑफ करून ठेवा. स्टँड बाय मोडमध्ये 10 ते 20 टक्के वीज खर्च होते.
- एसी 23 - 25 डिग्री वर ठेवा. या तापमानावर ग्रीन हाउस गॅस कमी होते आणि एसी 3 ते 5 टक्क्यांनी कमी वीज खर्च होते.
- फ्रिजचा दरवाजा सातत उघड बंद करू नका.
(Image Credit : savetreessaveearth.com)
झाडं वाचवा, झाडं लावा
- ज्या गोष्टी तुम्ही कंप्यूटर, मोबाइल, ईमेल किंवा डिजिटल डायरीमध्ये लिहू शकता. त्यासाठी पेपरचा वापर करू नका.
- सतत प्रिंट घेण्याऐवजी एकदाच फायनल फ्रिंट घ्या. प्रिंट छोट्या साइजमध्ये घ्या आणि लाइनमध्ये मार्जिन कमी ठेवा. त्यामुळे कमी कागदाचा वापर होतो.
- प्रत्येक वर्षी कमीत-कमी झाडं लावा. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये झाडं लावा आणि त्यांची काळजी घ्या.
- पुस्तकं, मॅगझिन, मूव्ही, गेम्स इत्यादी मित्रांसोबत शेअर करा. त्यामुळे पेपर, प्लास्टिक इत्यांदीचा वापर फार कमी होतो.
- जुन्या गोष्टी टाकून देण्याऐवजी गरजू लोकांना द्या.
आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही पर्यावरणाबाबत जागरूक करा. जर तुमचे शेजारी पाण्याचा गैरवापर करून गाडी धुत असतील तर त्यांना असं करण्यापासून थांबवा. असा विचार करू नका की, त्यांना वाईट वाटेल. त्यांनाही पर्यावरणाप्रति आपल्या जबाबदारीची जाणिव करून द्या.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही.