विद्यार्थ्यावर केले कर्कटकचे १०८ वार! बाल कल्याण समितीने मागवला पोलिसांकडून तपास अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 05:56 AM2023-11-28T05:56:56+5:302023-11-28T05:57:46+5:30
Crime News: येथील एका खासगी शाळेत झालेल्या भांडणात चौथीच्या एका विद्यार्थ्याच्या पायावर त्याच्या तीन वर्गमित्रांनी अभ्यासात वापरल्या जाणाऱ्या कर्कटकने १०८ वेळा वार केल्याची घटना समोर आली आहे.
इंदूर (म.प्र.) : येथील एका खासगी शाळेत झालेल्या भांडणात चौथीच्या एका विद्यार्थ्याच्या पायावर त्याच्या तीन वर्गमित्रांनी अभ्यासात वापरल्या जाणाऱ्या कर्कटकने १०८ वेळा वार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची दखल घेत बाल कल्याण समितीने सोमवारी पोलिसांकडून तपास अहवाल मागवला.
हे प्रकरण धक्कादायक आहे. इतक्या लहान वयातील मुलांच्या या हिंसक वर्तनाचे कारण काय आहे हे शोधण्यासाठी आम्ही तपास अहवाल मागितला आहे. मुले हिंसक दृश्यांसह व्हिडीओ गेम खेळतात की नाही याचा शोध घेतला जाईल, असे सीडब्ल्यूसीच्या अध्यक्षा पल्लवी पोरवाल यांनी सांगितले. पीडितेच्या वडिलांचा आरोप आहे की, मुलाच्या शरीरावर गोंदल्यासारख्या खुणा उमटल्या आहेत.