दरमहिना ३०,००० पगार घेणाऱ्या महिला इंजिनिअरच्या घरी धाड; सापडला कुबेराचा खजिना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 02:44 PM2023-05-12T14:44:50+5:302023-05-12T14:45:36+5:30

इंजिनिअरकडे सापडलेल्या संपत्तीचा अंदाज यावरून लावून शकतो की, ३० हजार महिना पगार असून तिच्या फार्म हाऊसवर ३० लाख रुपये किंमतीचा ९८ इंचाचा टीव्ही होता.

30,000-per-month salary raid on the home of a female engineer Hema Mina, Found Crore Rupees | दरमहिना ३०,००० पगार घेणाऱ्या महिला इंजिनिअरच्या घरी धाड; सापडला कुबेराचा खजिना

दरमहिना ३०,००० पगार घेणाऱ्या महिला इंजिनिअरच्या घरी धाड; सापडला कुबेराचा खजिना

googlenewsNext

भोपाळ - मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये उच्चपदावरील महिला सहाय्यक अभियंतेच्या फार्महाऊसवर लोकायुक्त पथकाने धाड टाकली. यावेळी महिला इंजिनिअरकडे तब्बल ७ कोटींहून अधिक मालमत्ता असल्याचे उघड झाले. सध्या महिलेच्या घरी सापडलेल्या संपत्तीचा आढावा घेतला जात आहे. 

जेव्हा लोकायुक्तच्या पथकाने महिला इंजिनिअरच्या घरी छापेमारी केली, तेव्हा ३० हजार पगार असलेल्या या अधिकाऱ्याची संपत्ती आणि आलिशान लाईफस्टाईल पाहून तपास यंत्रणेतील अधिकाही हैराण झाले.  मिळालेल्या माहितीनुसार, इंजिनिअरच्या फार्म हाऊसवर एक स्पेशल रुम बनवण्यात आला होता. त्यात महागडी दारूसह सिगारेट उपलब्ध होत्या. महाग कार, २ ट्रक आणि महिंद्रा थारसह एकूण १० वाहने जप्त करण्यात आली. 

इंजिनिअरकडे सापडलेल्या संपत्तीचा अंदाज यावरून लावून शकतो की, ३० हजार महिना पगार असून तिच्या फार्म हाऊसवर ३० लाख रुपये किंमतीचा ९८ इंचाचा टीव्ही होता. हेमा मीणा या पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. इंजिनिअर हेमा मीणा यांच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर लोकायुक्त पथकाने ही कारवाई केली. 

फार्म हाऊसवर मिळालेले अनेक परदेशी श्वान 
माहितीनुसार, लोकायुक्तच्या पथकाला आतापर्यंत इंजिनिअरकडे ७ कोटींची संपत्ती असल्याचे आढळले आहे. त्यात जमीन, वाहने, बंगला, फार्म हाऊस, लाखोंची कृषी उपकरणे, अनेक परदेशी श्वान आणि गाई, फार्म हाऊसवर ६०-७० वेगवेगळ्या ब्रीडच्या गायीदेखील आहेत. 

हेमा मीणा यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काही वर्षांपूर्वी अशी नव्हती
सहाय्यक अभियंता म्हणून कंत्राटावर काम करणाऱ्या हेमा मीणा यांच्याबाबत अनेक चर्चा आहेत. काही वर्षांपूर्वी हेमा मीणा यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अशी नव्हती, असे लोक सांगतात. अचानक काही वर्षात असे काय घडले की करोडोंची मालमत्ता गोळा केली. दुसरीकडे, अभियंता हेमा मीणा सांगतात की, तिच्या वडिलांनी आणि भावाने या मालमत्ता विकत घेऊन मला दान केल्या. लोकायुक्त सर्व अँगलने तपास करत आहेत. 

तीन ठिकाणी छापेमारी
डीएसपीने सांगितले की, जेव्हा हेमा मीणाच्या उत्पन्नासह तिच्या मालमत्तेचे विश्लेषण केले गेले तेव्हा तिची मालमत्ता ३३२ टक्के जास्त असल्याचे आढळून आले. सध्या तीन ठिकाणी शोध घेतला जात आहे. आता मिळणाऱ्या गोष्टींसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक बोलावण्यात आले असून, ते इमारतीचे मूल्यांकन करणार आहेत. यासोबतच पशुसंवर्धन विभागाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. काही बाबींचे विश्लेषण केले जात आहे. 
 

Web Title: 30,000-per-month salary raid on the home of a female engineer Hema Mina, Found Crore Rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :raidधाड