बाबांच्या जिवावर निवडणुका जिंकता येत नाहीत; बागेश्वर बाबांचा राजकारण्यांना झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 07:56 PM2023-09-29T19:56:54+5:302023-09-29T19:59:40+5:30
दरबारामध्ये बागेश्वर बाबांनी वन मंत्री विजय यांची पोलखोल केली होती. यजमान नक्कीच वनमंत्री आहेत, पण पंडालचा खर्च सरकारी तिजोरीतून दिला आहे, असे बाबांनी सर्वांच्या समक्ष म्हटले होते.
वनमंत्र्यांची पोलखोल केल्यानंतर बागेश्वर बाबांनी राजकारण्यांना चांगलाच झटका दिला आहे. निवडणुका आल्या की मंत्र-संत्री सारे बाबा, साधुंच्या आश्रयाला जातात. त्यांचे अनुयायांचा पाठिंबा मिळविण्याचा राजकीय हेतू यामागे असतो. यावर बागेश्वर बाबांनी वक्तव्य केले आहे.
पत्रकारांशी बोलताना बागेश्वर यांनी बाबांच्या जिवावर निवडणुका जिंकता येत नाहीत, तर जनतेलाच बाबा मानले तर नक्कीच जिंकता येईल, असे म्हटले आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कथेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास कैलाश सारंग यांनी बागेश्वर यांना बोलविले होते.
या दरबारामध्ये बागेश्वर बाबांनी वन मंत्री विजय यांची पोलखोल केली होती. यजमान नक्कीच वनमंत्री आहेत, पण पंडालचा खर्च सरकारी तिजोरीतून दिला आहे, असे बाबांनी सर्वांच्या समक्ष म्हटले होते. मंत्री मनाने अत्यंत शुद्ध असल्याचे शास्त्री म्हणाले होते. पंडाल मोठा आहे आणि खूप खर्च येत आहे. त्यामुळे नेत्यांनी आम्हाला बोलवून सर्व खर्च वाचवला, असे बागेश्वर बाबा म्हणाले होते.
कधी काँग्रेस बाबांना कार्यक्रमांना बोलवत आहे, तर कधी भाजपा असा खेळ मध्य प्रदेशात सुरु आहे. दोन्ही पक्ष आता बाबांच्या मदतीने निवडणूक जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे बागेश्वर बाबांचे हे वक्तव्य अशा नेत्यांना झटका देणारे आहे.