बेवफा समोसा! प्रेमात धोका मिळताच 'त्याने' उघडलं दुकान; ब्रेकअप झालेल्यांसाठी खास ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 12:48 PM2023-05-23T12:48:50+5:302023-05-23T12:51:51+5:30
खासगी नोकरी सोडल्यानंतर प्रेमात फसवणूक झाल्याने विनीत तिवारी नावाच्या तरुणाने बेवफा समोसे नावाचं एक दुकान सुरू केलं आहे.
मध्य प्रदेशच्या रीवा शहरात बेवफा चायवाल्याची जोरदार चर्चा रंगली होती. आता प्रेमात वेड्या झालेल्या आणखी एका व्यक्तीने बेवफा समोसा सुरू केला आहे. याची गोष्ट जरा सारखीच आहे. खासगी नोकरी सोडल्यानंतर प्रेमात फसवणूक झाल्याने विनीत तिवारी नावाच्या तरुणाने रीवा येथील आदित्य हॉटेलजवळ बेवफा समोसे नावाचं एक दुकान सुरू केलं आहे.
गेल्या काही वर्षांत चहाच्या दुकानांची वेगवेगळी नावे देशभर प्रसिद्ध झाली आहेत. आता चहाच्या दुकानांव्यतिरिक्त समोशाच्या दुकानांनाही अनोखी नावे दिली जाऊ लागली आहेत. यापैकी एक नाव रीवामध्ये प्रसिद्ध झाले आहे, जे म्हणजे बेवफा समोसे.
तरुण नवनवीन स्टार्टअप सुरू करत आहेत. पदवीधर चहा विक्रेत्यापासून MBA चायवाला असे अनेक जण आहेत. अशातच आता रीवामधला बेवफा समोशाची देखील लोकांमध्ये चर्चा रंगली असून तो लोकप्रिय होत आहे.
15 रुपयांना समोसा
रीवा येथे बेवफा समोसाचे दुकान उघडल्यापासून ते चर्चेत आले आहे. प्रेमात फसवणूक झाल्यानंतर एका तरुणाने ‘बेवफा समोसे वाला’ या नावाने दुकान उघडलं. विशेष म्हणजे या दुकानात प्रेमात फसवणूक झालेल्या प्रेमी युगुलांसाठी खास सवलत उपलब्ध आहे. जे समोसे इतरांना 15 रुपयांना दिले जातात, ते फक्त 10 रुपयांत. मन दुखावलेल्यांसाठी ही खास ऑफर आहे.
लोकांना बेवफा समोसा खूप आवडतो. येथे अनेक प्रकार देखील येथे उपलब्ध आहेत. ज्यात रायता समोसा सर्वात प्रसिद्ध आहे. याशिवाय मटर समोसा, दही समोसा यांनाही लोक पसंती देत आहेत. समोशासोबतच लोकांना चटणी खूप आवडते. कैरीच्या चटणीशिवाय टोमॅटोची चटणी समोस्यांची चव वाढवते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.