Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 09:19 PM2024-09-27T21:19:30+5:302024-09-27T21:21:18+5:30
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी उज्जैनमध्ये मोठी दुर्घटना घडली.
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळला असला तरी नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. शुक्रवारी सायंकाळी उज्जैनमध्ये मोठी दुर्घटना घडली. येथे महाकाल मंदिराच्या गेट क्रमांक चारजवळ बांधलेली भिंत चिखलामुळे कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची शक्यता आहे.
#WATCH | Madhya Pradesh: 2 dead and 2 injured after a building collapsed in Ujjain due to heavy rain. More people feared trapped, further details awaited
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) September 27, 2024
(Visuals from hospital) pic.twitter.com/zuvL5fAWOO
माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य हाती घेतले. भिंत कोसळल्याने काही जण जखमीही झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेरिटेज वास्तू म्हणून विकसित करण्यात येत असलेल्या महाकाल मंदिराजवळील महाराज वाडा शाळेची भिंत कोसळली.
#WATCH | Ashok Patel, Chief Medical Officer of Health says, " 4 people were brought here, 2 among them were declared dead and 2 are undergoing treatment...our team is present here and prepared to receive if more people are brought in..." https://t.co/bEflD8YAxjpic.twitter.com/kGfCgbUbB3
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) September 27, 2024
मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये सतत पाऊस पडत आहे. हवामान खात्याने इंदूर-उज्जैन, जबलपूर आणि ग्वाल्हेर विभागात पावसाचा इशारा दिला आहे. IMD च्या मते, मध्य प्रदेशात आतापर्यंत सरासरी ४२.६ इंच पाऊस झाला आहे. वास्तविक, हवेच्या वरच्या भागात चक्रीवादळ तयार झाले असून, त्यामुळे उत्तर मध्य प्रदेशात शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. अशा स्थितीत पुढील दोन-तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. विशेषत: इंदूर, उज्जैन, रेवा, ग्वाल्हेर आणि सागरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.