असेही करता येते...? गर्लफ्रेंडने दुसऱ्यासोबतच साखरपुडा केला; प्रियकर ८० लाखांच्या खर्चाचे पुरावे घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 17:08 IST2025-02-02T17:08:08+5:302025-02-02T17:08:35+5:30
गेल्या तीन वर्षांत या तरुणाने तरुणीवर ८० लाख रुपये खर्च केले आहेत. आता ती दुसऱ्याच मुलाशी लग्न करत आहे.

असेही करता येते...? गर्लफ्रेंडने दुसऱ्यासोबतच साखरपुडा केला; प्रियकर ८० लाखांच्या खर्चाचे पुरावे घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचला
मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यामध्ये प्रेमप्रकरणाचा विचित्रच प्रकार समोर आला आहे. आजवर प्रियकराने फसविल्याच्या तक्रारी घेऊन प्रेयसी पोलिस ठाण्यात जात होती. आता तर प्रियकरच तिच्यावर केलेल्या सगळ्या खर्चाचे पुरावे घेऊन पोलिस ठाण्यात गेला आहे. प्रेयसीने आपल्याला फसविल्याचा आरोप करत त्याने कुठे कुठे तब्बल ८० लाख रुपये खर्च केले याचा लेखाजोखाच पोलिसांसमोर मांडला आहे.
गेल्या तीन वर्षांत या तरुणाने साखरपुडा दुसऱ्यासोबत करणाऱ्या तरुणीवर ८० लाख रुपये खर्च केले आहेत. आता ती दुसऱ्याच मुलाशी लग्न करत आहे. साखरपुडा झाल्यानंतर तिने मला व्हिडीओ कॉलही केला होता, असा आरोप या तरुणाने केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्या गर्लफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या दोघांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला ८० लाख रुपये कॅश आणि गिफ्टच्या स्वरुपात दिले होते. महाकाल मंदिरात या दोघांनी लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. तिनेच त्यापूर्वी लग्न करण्याचे म्हटले होते. असे या तरुणाने तक्रारीत म्हटले आहे.
विवेक शुक्ला असे या तरुणाचे नाव आहे. तर तरुणी ही डभौराची राहणारी आहे. २०२१ मध्ये ती संपर्कात आली होती. नंतर ते प्रेमात पडले होते. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. तिने त्याच्याकडे अनेकदा पैशांची मागणी केली होती. त्याने तिच्या खात्यावर २२ लाख रुपये भरले होते. दागिने, मोबाईल आणि हिऱ्याची अंगठी देखील तिला दिली होती. या सर्व व्यवहारांचे पुरावे आहेत. हे 922 पानांचे पुरावे घेऊन शुक्ला हा पोलिस ठाण्यात गेला होता.
साखरपुड्यानंतर व्हिडीओ कॉल केला...
साखरपुड्यानंतर व्हिडीओ कॉल करून त्रास करून घेऊ नको, असे तिने सांगितले होते. पोलिसांनी तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे, याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.