"भाजपा हिंदूंना तर AIMIM मुस्लिमांना भडकावतो",  दिग्विजय सिंहांचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 04:34 PM2024-04-13T16:34:20+5:302024-04-13T16:36:30+5:30

Lok Sabha Election 2024 :  राजगड लोकसभा या जागेवरून दिग्विजय सिंह काँग्रेसचे उमेदवार आहेत.

Digvijay Singh's big allegation, say- 'BJP instigates Hindus and AIMIM instigates Muslims', Lok Sabha Election 2024  | "भाजपा हिंदूंना तर AIMIM मुस्लिमांना भडकावतो",  दिग्विजय सिंहांचा मोठा आरोप

"भाजपा हिंदूंना तर AIMIM मुस्लिमांना भडकावतो",  दिग्विजय सिंहांचा मोठा आरोप

आगर मालवा : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. यादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपा आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनवर (एआयएमआयएम)  मिलीभगत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, हैदराबादचे खासदार व एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना पैसे कुठून मिळतात? याबाबतही सवाल दिग्विजय सिंह यांनी विचारला आहे.

भाजपा हिंदूंना भडकवते, तर ओवेसींचा पक्ष एआयएमआयएम मुस्लिमांना भडकावतो, असा आरोप करत दोन्ही पक्ष एकमेकांना पूरक आहेत आणि समन्वयाने काम करतात, असे दिग्विजय सिंह म्हणाले. राजगड लोकसभा मतदारसंघातील आगर मालवा जिल्ह्यातील सुसनेर येथे एका सभेला दिग्विजय सिंह संबोधित करत होते. राजगड लोकसभा या जागेवरून दिग्विजय सिंह काँग्रेसचे उमेदवार आहेत.

दिग्विजय सिंह म्हणाले, "ओवेसी हैदराबादमध्ये उघडपणे मुस्लिमांना भडकवतात, भाजपा इथल्या हिंदूंना भडकवते. पण मी तुम्हाला विचारतो की, मुस्लिमांची मते कापण्यासाठी ओवेसींना मैदानात उतरवण्यासाठी पैसा कुठून येतो? ते एकत्र राजकारण करतात. ते एकमेकांना पूरक आहेत. देशात लोकशाहीची हत्या झाली आहे आणि लोकांना तुरुंगात पाठवले जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बरोबरच म्हणाल्या की, भाजपा कलंकित नेत्यांना साफ करण्याचे वॉशिंग मशीन बनले आहे."

स्वत: 'सनातनी' असल्याचे सांगत दिग्विजय सिंह म्हणाले की, "आमच्या पार्टीने नेहमीच सनातन धर्माला पाठिंबा दिला. जी 'सर्वधर्म समभाव' मानते. मी कट्टर हिंदू आणि गोसेवक आहे. मी गोहत्येच्या विरोधात आहे, पण मी धर्माच्या नावावर मत मागत नाही. तसेच अयोध्येत राम मंदिर उभारणीचे श्रेय भाजपला जात नाही तर न्यायालयाला जाते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात याच ठिकाणी राम मंदिराची पायाभरणी झाली होती, मात्र त्यांनी (भाजपा) विरोध केला."

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिग्विजय सिंह यांना राजगड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. दिग्विजय सिंह यांनी डिसेंबर 1993 मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी 1984 आणि 1991 मध्ये या जागेचे प्रतिनिधित्व केले होते. तर या जागेवर दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपाने विद्यमान खासदार रोडमल नागर यांना रिंगणात उतरवले आहे. 
 

Web Title: Digvijay Singh's big allegation, say- 'BJP instigates Hindus and AIMIM instigates Muslims', Lok Sabha Election 2024 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.