दिग्गज रिंगणात, शिवराज सिंह यांचा रस्ता काटेरी; तिसऱ्या यादीतही नाव नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 09:51 AM2023-09-27T09:51:20+5:302023-09-27T09:51:47+5:30

भाजपच्या तिसऱ्या यादीतही नाव नाही

In the veteran arena, Shivraj Singh's road is thorny; There is no name in the third list either | दिग्गज रिंगणात, शिवराज सिंह यांचा रस्ता काटेरी; तिसऱ्या यादीतही नाव नाही

दिग्गज रिंगणात, शिवराज सिंह यांचा रस्ता काटेरी; तिसऱ्या यादीतही नाव नाही

googlenewsNext

संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : तीन केंद्रीय मंत्री व चार खासदारांना मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची भाजपची रणनीती ही कोणत्याही किमतीवर राज्यातील सत्ता वाचवण्याचेच संकेत देत आहे. आतापर्यंत उमेदवारांच्या तीन यादीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे नाव नसल्याने त्यांच्यासाठी पुढचा रस्ता काटेरी आहे, कारण भावी मुख्यमंत्र्यांच्या रूपात त्यांना प्रोजेक्टही केले जाणार नाही.

मध्यप्रदेशात सर्वाधिक काळ राज्य करणारे मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंह चौहान यांचे नाव घेतले जाईल. ते सुमारे १८ वर्षे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते; परंतु भाजप त्यांना येथेच रोखू इच्छित आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, फग्गन सिंह कुलस्ते आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा सरळ अर्थ असा आहे की, आता यापुढे मध्यप्रदेशातील राजकारणाची सूत्रे शिवराज सिंह चौहान यांच्या हाती असणार नाहीत. भावी मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही एका नेत्याला प्रोजेक्ट करण्याऐवजी भाजप सामूहिक नेतृत्वात निवडणुका लढवणार आहे. 

यापूर्वीही केला प्रयोग
n भाजप नेत्यांचा दावा आहे की, केंद्रीय मंत्री व खासदारांसारख्या दिग्गज नेत्यांना निवडणुकीत उतरवण्याचे काम भाजपने यापूर्वीही केले होते; तेच यावेळीही केले आहे.
n यूपीत  अखिलेश यादव यांच्या विरोधात भाजपने मंत्री एसपीएस बघेल यांना तिकीट दिले होते.
n सोनिया गांधी यांच्याविरोधात दिवंगत सुषमा स्वराज यांना रिंगणात उतरवले होते. 
n दिवंगत माधवराव सिंधिया यांच्या विरोधात १९८४ मध्ये ग्वाल्हेरमधून दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी निवडणूक लढवली होती.
n कमलनाथ यांच्या विरोधात भाजपने छिंदवाडा येथून माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.
n त्रिपुरात केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांनी निवडणूक लढविली.

लढण्यावर साशंकता
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे नाव भाजपने घोषित केलेल्या आतापर्यंतच्या तीन याद्यांतील ७९ नावांमध्ये आलेले नाही. याचा अर्थ स्पष्ट समजला जात आहे की, भाजप त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवू इच्छित नाही.

 

 

Web Title: In the veteran arena, Shivraj Singh's road is thorny; There is no name in the third list either

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.