ज्योतिरादित्य शिंदेंनी अखेरच्या क्षणाला बाजी पलटली; सपाचा उमेदवार अर्ज न भरताच भाजपात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 08:08 AM2023-10-31T08:08:54+5:302023-10-31T08:09:22+5:30
तिवारी हे शिंदेंसोबत २०२० मध्येच भाजपात आले होते. परंतू, यावेळी त्यांना खरगपूर येथून तिकीट हवे होते.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सपाला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशीच सपाच्या उमेदवाराला भाजपात सहभागी करून घेतले आहे. हा उमेदवार मुळचा शिंदे समर्थकच होता. भक्ती तिवारी यांनी पुन्हा एकदा भाजपाचे सदस्यत्व घेतले आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन त्यांनी भाजपा सोडले होते.
तिवारी हे शिंदेंसोबत २०२० मध्येच भाजपात आले होते. परंतू, यावेळी त्यांना खरगपूर येथून तिकीट हवे होते. भाजपात त्यांची वर्णी लागली नाही म्हणून ते काँग्रेसमध्ये गेले होते, तिथेही तिकीट नाही मिळाले म्हणून ते सपामध्ये गेले होते. परंतू, शेवटच्या दिवशी त्यांना पुन्हा आपल्या गोटात आणण्यात शिंदेंना यश आले आहे.
खरगपूर येथून भाजपाने उमा भारतींचा भाचा आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री राहुल सिंह लोधी यांना मैदानात उतरविले आहे. तिवारी यांनी आता त्यांचा प्रचार करण्य़ाचे कबुल केले आहे. मध्य प्रदेशमध्ये अर्ज भरण्याची अखेरची तारीख संपली आहे. २१ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या काळात एकूण 3832 उमेदवारांनी 4359 अर्ज भरले आहेत.