सायकल चालवायचा शौक! 69769 किमींचा रेकॉर्ड; जितेंद्र कोठारींचा हार्ट अटॅकने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 05:59 PM2024-07-06T17:59:30+5:302024-07-06T17:59:49+5:30
आजकाल व्यायाम करणे देखील जिवावर बेतू लागले आहे. अनेकांचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाल्याचे व्हिडीओ देखील येत असतात.
आजकाल व्यायाम करणे देखील जिवावर बेतू लागले आहे. अनेकांचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाल्याचे व्हिडीओ देखील येत असतात. अशातच सायकल स्वाराचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे.
मध्य प्रदेशचे प्रसिद्ध सायकलपटू जितेंद्र कोठारी यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. अशोकनगर जिल्ह्यात राणाऱ्या कोठारींनी हार्ट अटॅक आला होता. त्यांनी 69769 किमी सायकल चालविल्याचा दावा केला होता. त्यांनी जिल्ह्यालाच अनेकदा फेऱ्या मारल्या होत्या.
कोठारी हे नगर पालिकेचे सहाय्यक ग्रेड २ चे कर्मचारी होते. २८ मे रोजी त्यांना छातीत दुखू लागले होते. यामुळे त्यांना अहमदाबादला उपचारासाठी नेण्यात आले होते. यानंतर त्यांना ५ जुलैला अटॅक आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
अहमदाबादमध्ये त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली होती. त्यांच्या शरीरात चार ब्लॉकेड असल्याचे समोर आले होते. यानंतर त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती. या ऑपरेशननंतर काही दिवसांनी त्यांना शुक्रवारी पुन्हा छातीत दुखू लागले होते. एका सायकल स्वाराच्या रक्तवाहिन्यांमध्ये चार ब्लॉकेज कसे, असा सवालही अनेकांना पडला आहे. कोठारी दिवसाला १०० किमी सायकल चालवायचे.