पुलाचा कठडा तोडून ५० फूट नदीत कोसळली बस; अतिवेगाने २२ ठार;मध्य प्रदेशातील इंदूरजवळील भीषण दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 05:41 AM2023-05-10T05:41:28+5:302023-05-10T05:41:45+5:30

जखमींना खरगोन येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

The bus broke the bank of the bridge and fell into the river 50 feet; 22 killed in over speeding | पुलाचा कठडा तोडून ५० फूट नदीत कोसळली बस; अतिवेगाने २२ ठार;मध्य प्रदेशातील इंदूरजवळील भीषण दुर्घटना

पुलाचा कठडा तोडून ५० फूट नदीत कोसळली बस; अतिवेगाने २२ ठार;मध्य प्रदेशातील इंदूरजवळील भीषण दुर्घटना

googlenewsNext

खरगोन/भोपाळ : मध्य प्रदेशातील खरगोनहून इंदूरला जाणारी खासगी प्रवासी बस मंगळवारी सकाळी एका ५० फूट उंच पुलावरून कोरड्या नदीत पडल्याने २२ जण ठार झाले आणि २० हून अधिक जखमी झाल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मिश्रा यांनी सांगितले की, ही दुर्घटना सकाळी ८:४० च्या सुमारास घडली. डोंगरगावजवळ दसंगा पुलाचे कठडे तोडून बस बोराड नदीत पडली. या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. माँ शारदा ट्रॅव्हल्सची बस खरगोनमधील बेजापूरहून इंदूरच्या दिशेने जात होती. त्यात ५० ते ६० प्रवासी होते. वेग जास्त असल्याने ती अनियंत्रित होऊन पुलावरून खाली पडली. कोरड्या नदीमुळे बहुतांश प्रवासी जखमी झाले. १५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. सर्व प्रवासी खरगोन, इंदूर परिसरातील रहिवासी आहेत.

जखमींना खरगोन येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन घटनास्थळी शक्य ती सर्व मदत पुरवण्यात गुंतले होते.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ६ लाखांची मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्ते अपघातातील मृत्युबद्दल शोक व्यक्त केला आणि पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. गंभीर जखमींना ५० हजार रुपये आणि किरकोळ जखमींना २५ हजार रुपये दिले जातील, असे जाहीर केले.

Web Title: The bus broke the bank of the bridge and fell into the river 50 feet; 22 killed in over speeding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात