“मी ज्योतिषी नाही, पण संपूर्ण बहुमताने भाजपचेच सरकार बनेल”; ज्योतिरादित्य शिंदे ठाम 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 10:26 AM2023-12-03T10:26:56+5:302023-12-03T10:29:36+5:30

Madhya Pradesh Assembly Election Result 2023: जनतेचा आशिर्वाद आमच्या पाठिशी आहे, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे.

union minister jyotiraditya scindia reaction over madhya pradesh assembly election result 2023 | “मी ज्योतिषी नाही, पण संपूर्ण बहुमताने भाजपचेच सरकार बनेल”; ज्योतिरादित्य शिंदे ठाम 

“मी ज्योतिषी नाही, पण संपूर्ण बहुमताने भाजपचेच सरकार बनेल”; ज्योतिरादित्य शिंदे ठाम 

Madhya Pradesh Assembly Election Result 2023: मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांसाठी मतदान झाल्यानंतर आता मतमोजणी होत आहेत. सुरुवातीला जे कल येत आहेत, त्यानुसार भाजप १५२ जागांवर पुढे असल्याचे दिसून येत आहे, तर काँग्रेस ७०, बसप १ आणि अन्य ६ जागांवर पुढे असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीचे कल लक्षात घेतल्यास मतदारांनी पुन्हा शिवराज सिंह चौहान यांच्यावर विश्वास दाखवल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशात केवळ बहुमताने नाही, तर संपूर्ण बहुमताने भाजपचे सरकार येईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, मध्य प्रदेशात आमचे डबल इंजिनचे सरकार आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वावर जनतेला विश्वास आहे. जनकल्याण आणि गरीबांसाठी योजना आहेत. सेवा आणि सुशासनाचे आमचे सरकार आहे. जनतेचा पूर्ण आशिर्वाद आमच्या पाठिशी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, मध्य प्रदेशात पुन्हा भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार बनेल.

जनतेचा पूर्ण आशिर्वाद भाजपसोबत राहील

राज्यात ठिकठिकाणी मिठाईची व्यवस्था केली जात होती. काही ठिकाणी आमच्याविरोधात बॅनरबाजी केली जात होती. खोचक टिप्पणी केली जात होती. मात्र, आधी निकाल येऊदेत, असे मी सातत्याने सांगत आलो आहे. जनतेचा पूर्ण आशिर्वाद भाजपसोबत राहील. राज्यातील जनतेला मी नमन करतो. आता सुरुवातीचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. स्पष्ट निकाल येईपर्यंत वाट पाहुया. मी नेहमी हेच सांगत आलो आहे की, मी काही ज्योतिषी नाही. परंतु, मध्य प्रदेशात संपूर्ण बहुमत असलेले भाजपचे सरकार स्थापन होईल, यात शंका नाही, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, दिग्विजय सिंह यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, दिग्विजय सिंह यांनी केलेल्या टीकेचे स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो, असे सांगत यावर अधिक भाष्य ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले नाही.

 

Web Title: union minister jyotiraditya scindia reaction over madhya pradesh assembly election result 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.