मासळीची जलद वाहतूक करण्यासाठी १ कोटी १0 लाखाचा निधी

By admin | Published: March 6, 2015 01:38 AM2015-03-06T01:38:09+5:302015-03-06T01:38:09+5:30

मत्स्य व्यवसायाला चालना; सहकारी संस्थांना मदत.

1 crore 10 lakhs of funds for fast fishing | मासळीची जलद वाहतूक करण्यासाठी १ कोटी १0 लाखाचा निधी

मासळीची जलद वाहतूक करण्यासाठी १ कोटी १0 लाखाचा निधी

Next

खामगाव (जि. बुलडाणा) : राष्ट्रीय सहकार विकास निगममार्फत (एनसीडीसी) अंतर्गत मच्छिमार सहकारी संस्थांना बर्फ कारखाने व शीतगृह उभारणे, मासळीची जलद वाहतूक करण्यासाठी तीन संस्थांना १ कोटी १0 लाख ७७ हजार रुपयांचा निधी ४ मार्च रोजी मत्स्यव्यवसाय विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे.
राज्यात मत्स्य व्यवसायाला चालना मिळावी यासाठी शासनाकडून सहकारी संस्थांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत देण्यात येते. त्यामुळे मासोळीचे सुरक्षण, परिवहनसाठी ट्रक, टेम्पो खरेदी करणे, डिझेल टँकर खरेदी करणे, गोदामांचे बांधकाम करणे इत्यादीसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना सन १९७७-७८ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. याकरिता राष्ट्रीय सहकार विकास निगमने विहित केलेल्या आकृतीबंधाप्रमाणे शासन निर्णय २८ मार्च १९८८ अन्वये राज्य शासनाकडून मच्छिमार सहकारी संस्थांना अर्थसहाय्य करण्यासाठी आकृतिबंध निश्‍चित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय सहकार विकास निगम योजने अंतर्गत राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेखाली संस्थांना अर्थसहाय्यकरिता १ कोटी १0 लाख ७७ हजार रुपये इतका निधी बी.डी. एस. प्रणालीवर वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा निधी शासनाच्या अटी पूर्ण झाल्यावर मिळणार आहे. सदर निधी बर्फ कारखाना, खास विमोचक भागभांडवल, भागभांडवल व कर्ज साठी एकूण तीन संस्थांना एकूण १ कोटी १0 लाख ७७ हजार रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या निधीमुळे मत्स्यव्यवसायाला चालना मिळणार आहे.

Web Title: 1 crore 10 lakhs of funds for fast fishing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.