किराणा दुकानदाराच्या मुलीला एक कोटीचे पारितोषिक

By admin | Published: April 15, 2017 12:45 AM2017-04-15T00:45:40+5:302017-04-15T00:45:40+5:30

शहरातील खंडोबा गल्लीत राहणाऱ्या व पुण्यात एआयएसएसएमएस महाविद्यालयात बीई द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या श्रद्धा मोहन मेंगशेट्टे या मुलीला डीजी धन योजनेअंतर्गत

1 crore prize for grocery store girl | किराणा दुकानदाराच्या मुलीला एक कोटीचे पारितोषिक

किराणा दुकानदाराच्या मुलीला एक कोटीचे पारितोषिक

Next

- राजकुमार जोंधळे,  लातूर

शहरातील खंडोबा गल्लीत राहणाऱ्या व पुण्यात एआयएसएसएमएस महाविद्यालयात बीई द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या श्रद्धा मोहन मेंगशेट्टे या मुलीला डीजी धन योजनेअंतर्गत १ कोटी रुपयांचे कॅशलेस व्यवहारासाठीचे पारितोषिक
जाहीर झाले. नागपुरात तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान होताच शुक्रवारी लातूरमधील तिच्या घरी नातेवाईकांनी आनंदोत्सव साजरा केला.
लातूरच्या खंडोबा गल्लीत लहानाची मोठी झालेल्या श्रद्धाचे शिक्षण गोदावरीदेवी लाहोटी
कन्या शाळेत झाले. तिचे वडील गेल्या अनेक वर्षांपासून किराणा दुकान चालवितात. दुकानावरच्या मजल्यावर त्यांचे घर आहे.
श्रद्धाने काही दिवसांपूर्वी हप्त्यावर मोबाइलची खरेदी केली
होती. त्याचा हप्ताही तिने
डिजिटल माध्यमातून भरला
होता.
दरम्यान, कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने सुरू केलेल्या विशेष योजनेत तिला १ कोटींचे पारितोषिक मिळाले.

चार दिवसांपूर्वी कळले
श्रद्धाचे लातूरच्या गंजगोलाईतील सेंट्रल बँकेत सहा महिन्यांपूर्वी खाते उघडण्यात आले होते. या खात्याला पारितोषिक लागणार असल्याने शाखा व्यवस्थापक व इतर अधिकाऱ्यांनी चार दिवसांपूर्वी तिचे घर गाठून तिचा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार होणार असल्याचे कळविले होते. मात्र पारितोषिक १ कोटीचे असल्याचे सत्कारावेळीच कळले. त्यानंतर मेंगशेट्टे कुटुंबियांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

Web Title: 1 crore prize for grocery store girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.