1क्क् कोटी खचरूनही वाहतूककोंडीच

By admin | Published: June 8, 2014 01:04 AM2014-06-08T01:04:02+5:302014-06-08T03:02:11+5:30

रस्त्यात लुडबुडणा:या हातगाडय़ा व चौकात उभे राहून बघत बसलेले वाहतूक पोलीस यामुळे भोसरी उड्डाणपुलाला अवकळा आली आहे.

1 crores without even traffic | 1क्क् कोटी खचरूनही वाहतूककोंडीच

1क्क् कोटी खचरूनही वाहतूककोंडीच

Next
>भोसरी : अवैध धंदे, बेशिस्तपणो रस्त्यावर आडवी असणारी वाहने, खासगी आणि पीएमपीएलच्या बसेस, वाहतुकीचे नसलेले नियोजन, पुलाखाली व रस्त्यात लुडबुडणा:या हातगाडय़ा व चौकात उभे राहून बघत बसलेले वाहतूक पोलीस यामुळे भोसरी उड्डाणपुलाला अवकळा आली आहे. उड्डाणपुलाखाली चाललंय तरी काय? असा प्रश्न सगळीकडे विचारला जाऊ लागला आहे. सर्वसामान्यांना भेडसावणा:या या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन भोसरीचे कारभारी हे प्रश्न सोडविणार का? असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागले आहेत. 
पुणो-नाशिक महामार्गावर भोसरीत सतत होणारी वाहतूक कोंडी कायमची सोडविण्यासाठी तब्बल 1क्क् कोटी रुपये खर्च करून सुमारे दीड किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात आला.  मात्र येथील वाहतूक कोंडी सुटली का? असा प्रश्न अजूनही नागरिकांना पडत आहे. त्याला कारणही तसेच आहे. नाशिककडे अथवा दूरवर जाणारी वाहने उड्डाणपुलावरून जातील व भोसरी परिसरातील वाहने, पीएमपीएलची वाहने पुलाखालून हे नियोजन कागदावरच राहिले आहे. उड्डाणपुलावरून अगदी तुरळक वाहने जाताना दिसत आहेत. उड्डाणपुलावरून वाहतूक वळविण्यासाठी कुठेही नियोजन दिसून येत नाही. योग्य नियोजनाच्या अभावामुळे बेशिस्तपणो वाहतूक सुरू आहे व रस्त्यातच कुठेही वाहने लावली जात आहेत. याच्याकडे वाहतूक पोलिसांचाही कानाडोळा होत आहे. उड्डाणपुलाखाली चांदणी चौक ते अंकुशराव लांडगे नाटय़गृह हा भाग अत्यंत वर्दळीचा आहे. याच भागात जड वाहने कुठेही रस्त्यात उभी असतात. तसेच हातगाडय़ांचीही येथे मोठी वर्दळ आहे. रस्त्याने चालत जाणोही मुश्किल होत आहे. याठिकाणी कायम वाहतूक पोलिसांची गरज आहे.  रस्त्यात कुठेही गाडी लावली तरी कोणीही हटकत नाही. त्यामुळे बेशिस्त वाढली आहे. याचा त्रस सर्वसामान्य माणसांना होत आहे. उड्डाणपूल सुरू  करताना उड्डाणपुलाखाली वाहनतळ (पाकिर्ंग) व काही ठिकाणी लॅंडस्केप, गार्डन, सुशोभिकरण करण्याचे ठरले होते. रुपी बँक ते चांदणी चौक यादरम्यान वाहनतळाचे चांगले नियोजन झाले आहे. मात्र, पुढे चांदणी चौकापासून उड्डाणपूल संपेपयर्ंत बेशिस्तपणा, प्रशासन व भोसरीच्या कारभारामध्ये समन्वयाचा अभाव यामुळेच उड्डाणपुलाला अवकळा आली आहे.
(वार्ताहर)
 
4भोसरी परिसरातून मराठवाडा विदर्भाकडे जाणा:या खासगी ट्रॅव्हल्स खूप आहेत. लांडेवाडी व नाशिक महामार्गावर या टॅव्हल्स एजन्सींनी रस्त्यावरच आपला कारभार सुरू केला आहे. या गाडय़ा रस्त्यात खूप मोठा अडथळा ठरत आहेत. या व्यावसायिकांना नाटय़गृहापुढील जागेत गाडय़ा उभ्या करण्यास सांगितले होते. मात्र, यावर कोणाचेच नियंत्रण दिसून येत नाही. त्यामुळे पुलाखाली वाहतूक कोंडी वाढत आहे. 
 
4भोसरीत फक्त आळंदी रस्त्यावर पुलाखाली वाहतूक पोलीस असतात. एकाच ठिकाणी चार चार पोलीस बसलेले असतात. मात्र, त्यांना तिथूनच जवळ असणारी वाहतूक कोंडी रस्त्यावरची वाहने दिसत नाहीत का? वाहतूक पोलिसांपासून अगदी जवळच पुलाखाली अवैध धंदे सुरु आहेत. मात्र, त्याच्याकडेही कानाडोळा का करतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

Web Title: 1 crores without even traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.