कोकणातील १ लाख ९४० शेतकऱ्यांना कर्जमाफी

By admin | Published: July 5, 2017 04:42 AM2017-07-05T04:42:43+5:302017-07-05T04:44:13+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत राज्यातील ३६ लाख १० हजार २१६ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात आला

1 lakh 9 40 farmers of Konkan are in debt waiver | कोकणातील १ लाख ९४० शेतकऱ्यांना कर्जमाफी

कोकणातील १ लाख ९४० शेतकऱ्यांना कर्जमाफी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत राज्यातील ३६ लाख १० हजार २१६ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात आला आहे. यात दीड लाखापर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश आहे.
कोकण विभागात १ लाख ९४० शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यात २३ हजार ५०५, रायगड जिल्ह्यात १० हजार ८०९, रत्नागिरी जिल्ह्यात ४१ हजार २६१, पालघर जिल्ह्यात ९१८ आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यात २४ हजार ४४७ अशी लाभार्थ्यांची संख्या आहे. या कर्जात पुनर्गठण, नियमित कर्ज भरणारे तसेच ओटीएसचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश नाही.

Web Title: 1 lakh 9 40 farmers of Konkan are in debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.