दिवाळीसाठी एसटीची १० ते २० टक्के भाडेवाढ

By admin | Published: November 5, 2015 03:28 AM2015-11-05T03:28:07+5:302015-11-05T03:28:07+5:30

दिवाळीच्या हंगामासाठी एसटीची १० ते २० टक्के भाडेवाढ करण्यात आली असून, ही हंगामी भाडेवाढ फक्त ५ ते २५ नोव्हेंबर या कालावधीसाठीच लागू असणार आहे, अशी माहिती परिवहन

10 to 20 percent increase in ST fares for Diwali | दिवाळीसाठी एसटीची १० ते २० टक्के भाडेवाढ

दिवाळीसाठी एसटीची १० ते २० टक्के भाडेवाढ

Next

मुंबई : दिवाळीच्या हंगामासाठी एसटीची १० ते २० टक्के भाडेवाढ करण्यात आली असून, ही हंगामी भाडेवाढ फक्त ५ ते २५ नोव्हेंबर या कालावधीसाठीच लागू असणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
सणासुदीसाठी गावी जाणाऱ्यांची सोय व्हावी यासाठी एसटीच्या तीन हजार अधिकच्या गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सणासुदीसाठी ३० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय एसटीने दोन वर्षांपूर्वीच घेतला होता. त्या ऐवजी १० ते २० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे रावते म्हणाले. साधी व रातराणी सेवेसाठी १० टक्के, निमआराम (हिरकणी) साठी १५ टक्के आणि वातानुकूलित (शिवनेरी)साठी २० टक्के अशी वाढीव भाडे आकारणी करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: 10 to 20 percent increase in ST fares for Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.