मुंबईत १० बाईक अॅम्ब्युलन्स; आरोग्यमंत्र्यांची माहिती
By admin | Published: November 5, 2015 12:57 AM2015-11-05T00:57:12+5:302015-11-05T00:57:12+5:30
अपघातानंतर एका तासाच्या आत रुग्णाला रुग्णालयात नेणे आवश्यक असते. पण मुंबईत वाहतुकीची समस्या असल्यामुळे रुग्णवाहिका रुग्णालयात पाहोेचण्यास विलंब होतो. हे टाळण्यासाठी
मुंबई : अपघातानंतर एका तासाच्या आत रुग्णाला रुग्णालयात नेणे आवश्यक असते. पण मुंबईत वाहतुकीची समस्या असल्यामुळे रुग्णवाहिका रुग्णालयात पाहोेचण्यास विलंब होतो. हे टाळण्यासाठी मुंबईत १० बाईक रुग्णवाहिका लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती आरोग्यमंंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. मुंबईत पुढच्या काही दिवसांत ही सेवा राबवण्यात येणार असून ही सेवा १०८ क्रमांकाशी जोडली जाणार आहे. रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहोचण्यासाठी विलंब होत असल्यास या रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहोचणार आहेत. रुग्णांवर प्राथमिक उपचार करणार आहेत. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात रुग्णाला तातडीने रूग्णालयात नेण्यासाठी या बाईक रुग्णवाहिका उपयुक्त ठरणार आहेत, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
यात काय असणार ?
बाईक रुग्णवाहिकेत आॅक्सिजन पुरवठा यंत्र, पोर्टेबल आॅक्सिजन सिलिंडर, बंद पडलेले हृदयाचे ठोके कार्यान्वित करणारी यंत्रणा, नेब्युलायजर, आपत्कालीन औषधांची बॅग, विविध औषधे.