राज्यात १० शहरे ‘स्मार्ट’ होणार

By admin | Published: August 28, 2015 04:56 AM2015-08-28T04:56:43+5:302015-08-28T04:56:43+5:30

येत्या पाच वर्षांत देशातील किमान १०० शहरांचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकास करण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मिशनसाठी निवड झालेल्या ९८ शहरांची नावे केंद्रीय

10 cities will be 'smart' in the state | राज्यात १० शहरे ‘स्मार्ट’ होणार

राज्यात १० शहरे ‘स्मार्ट’ होणार

Next

नवी दिल्ली : येत्या पाच वर्षांत देशातील किमान १०० शहरांचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकास करण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मिशनसाठी निवड झालेल्या ९८ शहरांची नावे केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी जाहीर
केली. यात महाराष्ट्रातील १० शहरांचा समावेश करताना केंद्राने राज्याने
शिफारस केलेल्या यादीतून पिंपरी-चिंचवड वगळले आहे. पणजी हे गोव्याच्या राजधानीचे शहरही स्मार्ट शहरांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरमधील जम्मू की श्रीनगर आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली की मेरठ याचा निर्णय न झाल्याने राहिलेल्या दोन प्रस्तावित ‘स्मार्ट सिटी’ज्ची नावे नंतर जाहीर करण्यात येणार आहेत.

अशी झाली महाराष्ट्रातील शहरांची निवड
मिशनच्या रचनेनुसार प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करायच्या शहरांचा आकडा ठरविला होता. त्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला
१० शहरे आली होती.
राज्य सरकारांनी आपल्याकडील कोणती शहरे अशा प्रकारे विकसित केली जावीत हे पूर्वनिर्धारित निकषांनुसार ठरवून तसे प्रस्ताव
३१ जुलैपर्यंत केंद्राकडे पाठवायचे होते.
राज्य सरकारने पुणे व पिंपरी-चिंचवड यांची एकत्र मोट बांधून १० शहरांची नावे पाठविली होती. केंद्र सरकारने त्यातून पिंपरी-चिंचवड वगळून १० शहरांची निवड केली आहे.

ही आहेत शहरे..
शहर लोकसंख्या (आकडेवारी लाखांत)
बृहन्मुंबई १२४
पुणे३१.२४
ठाणे १८.४१
कल्याण-
डोंबिवली १५.१८
नाशिक १४.८६
औरंगाबाद ११.६५
नवी मुंबई ११.१९
नागपूर ९.५२
सोलापूर ७.४५
अमरावती ७.४२

आयटी संपर्कता व डिजिटायझेशन, नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब, ई-गव्हर्नन्स यांच्यासह पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, वाहतूक, घन कचरा व्यवस्थापन व परवडणारी घरे या सर्वाच्या माध्यमातून दर्जेदार नागरी जीवनमान उपलब्ध करून देण्याची योजना आहे. - एम. व्यंकय्या नायडू, नगरविकासमंत्री

Web Title: 10 cities will be 'smart' in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.