दुरोंतोचे १० डबे घसरले
By admin | Published: May 4, 2015 02:06 AM2015-05-04T02:06:47+5:302015-05-04T02:06:47+5:30
लोकमान्य टिळक टर्मिनसहून एर्नाकुलमकडे जाणाऱ्या दुरोंतो एक्स्प्रेसचे दहा डबे सारझोरा येथे बोगद्याजवळ रुळावरून घसरले. अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
लोकमान्य टिळक टर्मिनसहून एर्नाकुलमकडे जाणाऱ्या दुरोंतो एक्स्प्रेसचे दहा डबे सारझोरा येथे बोगद्याजवळ रुळावरून घसरले. अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
रविवार असल्याने सारझोरा भागातील ख्रिस्ती बांधव सकाळच्या प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जमले होते. प्रार्थनेसाठी दोन युवक जात असताना त्यांनी हा अपघात पाहिला. त्यांनी त्याबाबत फादरना कळविले. त्यानंतर चर्चमध्ये जमलेल्या बांधवांनी घटनास्थळी जाऊन प्रवाशांना चहा-नाश्ता दिला.
या अपघातात प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. अपघातानंतर कारवारहून एर्नाकुलमला जाण्यासाठी प्रवाशांना खास रेल्वे उपलब्ध करून देण्यात आली. कोकण रेल्वेतर्फे प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत घसरलेले डबे रुळावर आणण्याचे काम सुरू होते. सोमवारपासून हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला होईल, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.