वाढीव पाणीकपात १० दिवस पुढे

By admin | Published: June 29, 2016 12:45 AM2016-06-29T00:45:39+5:302016-06-29T00:45:39+5:30

धरणांमधील पाण्याची पातळी वेगाने खालावत असल्याने बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये वाढीव पाणीकपात १० दिवस पुढे ढकण्यात आली.

10 days ahead of the increased waterfall | वाढीव पाणीकपात १० दिवस पुढे

वाढीव पाणीकपात १० दिवस पुढे

Next


पुणे : धरणांमधील पाण्याची पातळी वेगाने खालावत असल्याने बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये वाढीव पाणीकपात १० दिवस पुढे ढकण्यात आली. संत तुकाराममहाराज, संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालख्यांचे आगमन होत आहे तसेच रमजान ईदचा सण असल्याने आणखी ८ दिवस वाट पाहून ८ जुलैपासून वाढीव पाणीकपात लागू करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी मंगळवारी दिली. याच वेळी शहराला आता पाणी पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्री गिरीश बापट यांची असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले.
महापौर प्रशांत जगताप यांनी पाटबंधारे विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी सकाळी पानशेत व वरसगाव या धरणांतील पाण्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महापालिकेमध्ये शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत बैठक घेतली. या वेळी सभागृह नेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, गटनेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस झाला नाही; त्यामुळे पाणीपुरवठ्याची स्थिती चिंताजनक झाली असल्याने त्यावर मार्ग काढण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. यामध्ये वारी व रमजान ईद झाल्यानंतर १० दिवसांनी पुन्हा आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘हवामान खात्याने ७ दिवसांनंतर चांगला पाऊस होईल, हा सांगितलेला अंदाज चुकीचा ठरला आहे. धरणांनी तळ गाठलेला आहे. शहरात अनेक ठिकाणी गाळमिश्रित पाणी येण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. सध्या धरणसाठ्यात १.५४ टीएमसी पाणी असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या २५ जुलैपर्यंत हे पाणी पुरेल, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र, तोपर्यंतच्या कालावधीत पाऊस न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल.’’
पाण्याचे कोणतेही नियोजन अद्याप पालकमंत्र्यांकडून करण्यात येत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
>मुळशी धरणाच्या पत्रव्यवहाराला मुख्यमंत्र्यांकडून उत्तर नाही : स्थिती गंभीर
सध्या पाण्याची स्थिती खूपच गंभीर बनली आहे. पाण्याचा आणखी एक पर्याय म्हणून मुळशी धरणातील पाण्याकडे पाहिले जात आहे. शहराला या धरणातून पाणी पुरविण्याबाबत विचार व्हावा, याकरिता महापौरांनी मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा पत्र पाठविले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना अद्याप त्याचे उत्तर देण्यासाठी वेळ मिळालेला नाही.
विहिरींची स्वच्छता करण्याच्या सूचना
पाऊस न झाल्यास आपत्कालीन उपाययोजना म्हणून शहरातील सर्व विहिरींमधील गाळ काढण्यात यावा. त्याचबरोबर, बोअरवेलची माहिती घेण्यात यावी. कोणत्या भागांना तातडीने टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, याची यादी करावी आदी सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Web Title: 10 days ahead of the increased waterfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.