येवला-मनमाड रस्त्यावर अपघातात 10 जणांचा मृत्यू, साखरपुड्याहून परतताना काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 06:11 AM2017-08-28T06:11:44+5:302017-08-28T07:33:15+5:30

साखरपुडा आटोपून धुळ्याकडे परतत असताना टायर फुटल्याने क्रूझर गाडी मागून येणा-या मारुती व्हॅनवर आदळून झालेल्या अपघातात दहा जण ठार, तर पंधराहून अधिक जखमी झाले.

10 dead in road accident on Yeola-Manmad road | येवला-मनमाड रस्त्यावर अपघातात 10 जणांचा मृत्यू, साखरपुड्याहून परतताना काळाचा घाला

येवला-मनमाड रस्त्यावर अपघातात 10 जणांचा मृत्यू, साखरपुड्याहून परतताना काळाचा घाला

googlenewsNext

नाशिक, दि. 27 -  साखरपुडा आटोपून धुळ्याकडे परतत असताना टायर फुटल्याने क्रूझर गाडी मागून येणा-या मारुती व्हॅनवर आदळून झालेल्या अपघातात दहा जणांचा मृत्यू , तर 15 हून अधिक जण जखमी झालेत. येवला- मनमाड रस्त्यावर बाभुळगाव शिवारात रविवारी सायंकाळी हा अपघात झाला. निजधाम आश्रमासमोर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येवल्याहून मनमाडच्या दिशेने एक क्रूझर अतिशय वेगाने जात होती. अचानक उजव्या बाजूचा टायर फुटल्याने ही क्रूझर उलटून मागून येणा-या मारु ती ओम्नी व्हॅनवर जोरात धडकली. त्यात मारुती ओम्नीव्हॅनचा चक्काचूर झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांमधील १० जणांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की गाडीतील मृतदेह अखेर दरवाजा तोडून काढावे लागले. स्थानिक संभाजीराजे पवार, दत्ता निकम, आणि  सावरगाव येथील पवार कुटुंबियांनी केवळ 15 मिनिटात मदत कार्य करीत अपघातग्रस्थानां  उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. 

येवला शहरापासून मनमाडच्या दिशेने बाभूळगाव शिवारातील निजधाम आश्रमासमोर रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मनमाडकडून येवल्याकडे येणाऱ्या धुळे-पुणे या एसटी बसला (एम.एच.४०एन.९८२१) पल्सर मोटारसायकल (एम.एच.४१ ए.जे.२४८०) ओव्हरटेक करीत होती. त्याचवेळी येवल्याकडून मनमाडच्या दिशेने जाणारी क्रुझर (एमएच.२६ ए.एफ१४८७) जीपच्या उजव्या बाजूचा टायर फुटल्याने क्रुझर जीप पलटी होऊन मारुतीओम्नी व्हॅन ( एम.एच.१५ बी.एन. ६४६७ ) . या गाडीवर धडकली. क्रुझरचा वेग जास्त असल्याने क्रुझरसह मारुती ओम्नीव्हॅनचा चक्काचूर झाला.

अपघाताची तिव्रता एवढी होती कि अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता तर मृतांचे अवयव विखुरले गेले होते. एसटी बसला किरकोळ नुकसान झाले. जखमींची संख्या जास्त असल्याने खाजगी डॉक्टरांनी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामध्ये येऊन शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्यांना उपचारासाठी मदत केली. क्रुझर गाडीतील अपघातग्रस्त धुळे भागातील असून ते कोळेपेवाडी येथुन साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपुन क्रुझरमधून धुळे येथे घरी परतत होते. क्रुझरमध्ये १५ ते १६ जण प्रवास करीत होते. ज्याचा साखरपुडा होता तो नवरदेव विजय गांगुर्डे रा. धुळे हा गाडीमध्ये जागा नसल्याने मित्राबरोबर मागून मोटारसायकलवर येत होता. अपघातातील काही जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना अधिक उपचारार्थ नाशिक येथे हलवण्यात आले आहे.

Web Title: 10 dead in road accident on Yeola-Manmad road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात