महाराष्ट्रात उष्माघातानं आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

By admin | Published: April 20, 2017 05:54 PM2017-04-20T17:54:38+5:302017-04-20T17:54:38+5:30

वाढत्या उष्माघातानं एप्रिल महिन्यात चंद्रपूर आणि सोलापूर या जिल्ह्यांतील दोन जिवानिशी गेल्याची माहिती समोर आली

10 deaths due to heat-related deaths in Maharashtra | महाराष्ट्रात उष्माघातानं आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात उष्माघातानं आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - उन्हाची काहिली दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतंय. वाढत्या उष्माघातानं एप्रिल महिन्यात चंद्रपूर आणि सोलापूर या जिल्ह्यांतील दोन जिवानिशी गेल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मार्चपासून आतापर्यंत उष्माघातानं 10 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात मार्च महिन्यांनंतर तापमानात सातत्यानं वाढ होतेय. आरोग्य विभागानंही लोकांना विनाकारण घराबाहेर न पडता काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आतापर्यंत उष्माघातामुळे 40 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, ते वांती आणि पित्ताच्या त्रासानं त्रस्त आहेत.

राज्य आरोग्य विभागानं जळगाव, अकोला, जालना, चंद्रपूर जिल्ह्यातील मिळून आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात गेल्या काही दिवसांपासून तापमानानं 40 अंश सेल्सियसचा टप्पा पार केला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वीच भीरा तालुक्यात तापमान 46.5 अंश सेल्सियस तापमानाचा उच्चांक गाठला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानानं 46.4 अंश सेल्सियसचा टप्पा ओलांडल्याचीही माहिती पुणे हवामान विभागानं दिली आहे.

विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात तापमान 45 अंश सेल्सियसच्या पार गेलं आहे. मुंबईमध्ये तापमान जवळपास 37 अंश सेल्सियसच्या जवळपास राहते. मृत्युमुखी पडलेल्या 10 जणांमध्ये तीन वरिष्ठ नागरिक आहेत, अशीही माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. आरोग्य विभागानं गेल्या चार वर्षांत उष्माघातानं बळी गेलेल्यांचा डाटा उघड केला आहे.

Web Title: 10 deaths due to heat-related deaths in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.