राज्यात चोवीस तासांत 10 शेतक:यांच्या आत्महत्या
By admin | Published: December 9, 2014 02:04 AM2014-12-09T02:04:06+5:302014-12-09T02:04:06+5:30
राज्य सरकारच्या आवाहनांनतरही दुष्काळग्रस्त परिस्थिती व कर्जाच्या बोजामुळे हताश झालेल्या 1क् शेतक:यांनी राज्यात गेल्या 24 तासांत आत्महत्या केली.
Next
दुष्काळाच्या झळा : मराठवाडय़ात आत्महत्येचे सत्र सुरूच
मुंबई : राज्य सरकारच्या आवाहनांनतरही दुष्काळग्रस्त परिस्थिती व कर्जाच्या बोजामुळे हताश झालेल्या 1क् शेतक:यांनी राज्यात गेल्या 24 तासांत आत्महत्या केली. त्यात दुष्काळाचा सामना कराव्या लागणा:या मराठवाडय़ातील सर्वाधिक सहा शेतक:यांचा समावेश आहे.
औरंगाबादमधील गंगापूर, कन्नड, नांदेडमधील अर्धापूर, बिलोली, बीडमधील गेवराई आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील प्रत्येकी एक अशा सहा जणांनी जगाचा निरोप घेतला.
गंगापूर तालुक्यातील सिरजगाव येथे सोमवारी सकाळी सुनील सयाची काळे (42) यांनी शेतवस्तीवर बांधलेल्या पत्र्यांच्या शेडमध्ये तर कन्नड तालुक्यातील शिरोडी येथील तरुण शेतकरी देविदास सीताराम भवर (25) यांनीही शेतात गळफास घेऊन सोमवारी आत्महत्या केली.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील आदमपूरच्या मष्णा लक्ष्मण एतोंडे (27) यांनी रविवारी रात्री गळफास घेवून शेतात आत्महत्या केली़ दोन एकर शेती असलेल्या मष्णा यांनी दोन वेळा शेतात विंधन विहीर खोदली. पण उपयोग झाला नाही.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तर अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे शिवाजी मुकुंदा कदम (43) यांनी नापिकी व कजर्बाजारीपणाला कंटाळून आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले, आई आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामधील माडज येथे नरसिंग लिंबाजी शहापुरे (6क्) यांनी घरी गळफास लावून घेतला. बीडमधील गेवराई तालुक्यातील टाकळगाव येथे हरिदास भूजंग गव्हाणो (25) यांनी सोमवारी विषारी द्रव प्राशन करून जीवन संपविले. त्यांच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ आहे.
परळी तालुक्यातील नागापूर येथील अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्य हनुमंत सोनटक्के व त्यांची पत्नी सुमित्र यांनी शनिवारी विषारी द्रव प्राशन केले होते. यात सुमित्र यांचा मृत्यू झाला होता तर हनुमंत यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सोमवारी अंबेजोगाई येथे त्यांचा मृत्यू झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जळगावमध्ये
दोघांच्या आत्महत्या
जामनेर तालुक्यात दोन शेतक:यांनी विषारी द्रव सेवन करून जीवनयात्र संपविली. केशरीमल गुलाब नाईक (45) सुभाष चतरसिंग चव्हाण (46) अशी त्यांची नावे आहेत.
सोलापूरमध्ये एकाची आत्महत्या
अडीच लाखांचे डोक्यावर झालेले कर्ज आणि निसर्गाची अवकृपा याला कंटाळून नारी (ता. बार्शी) येथील शहाजी गजेंद्र शिंदे (45) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. शनिवारी सायंकाळी शेतामध्ये त्यांनी विष प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन मुले, प}ी आहेत
यवतमाळमध्ये एकाने जीवन संपविले
यवतमाळ जिल्ह्यातील तुकाराम बाबूलाल चव्हाण (35,रा. भोपापूर) यांनी विषप्राशन करून जीवन संपविले. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुले, वृद्ध आई-वडील, लहान भाऊ आहे.