१० फुटी अजगराला मिळाले जीवदान

By admin | Published: May 21, 2016 03:10 AM2016-05-21T03:10:34+5:302016-05-21T03:10:34+5:30

पेण बोरगाव नारायणवाडी येथील घराच्या अंगणात भक्ष्याच्या शोधात आलेला १० फुटी अजगर जाळ्यात अडकून पडला.

10 gallons of gallows found alive | १० फुटी अजगराला मिळाले जीवदान

१० फुटी अजगराला मिळाले जीवदान

Next


पेण : पेण बोरगाव नारायणवाडी येथील घराच्या अंगणात भक्ष्याच्या शोधात आलेला १० फुटी अजगर जाळ्यात अडकून पडला. या वाडीवरच्यांनी पेणचे सर्पमित्र किरण देव यांना पाचारण करून, देव यांनी या अजगराची सोडवणूक करून जीवदान दिले.
२० ते २२ किलो वजनाचा हा अजगर रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात आला असावा. मात्र शिकार करण्याआधीच जेरबंद झाल्याने जाळ्यात निपचित पडला होता. मात्र सर्पमित्र किरण देव यांनी त्या अजगराची सुटका के ली. या घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आल्याने वनक्षेत्रपाल शिवाजी पवार यांनी या सापाला संवर्धनाच्या दृष्टीने ताब्यात घेवून पेण वनपाल पी. के. म्हात्रे व त्यांचे सहकारी वसंत पोईलकर, माने यांनी अजगराला दूर जंगलात सोडून दिले. सरीसृप वर्गातील सर्वात आधी जन्माला आलेला हा साप यांची वाढ २० ते २२ फुटांपर्यंत होते. तर पायथोन रेटीक्यूलाटस प्रजातीतील अजगर ३० ते ३५ फुटापर्यंत वाढतो. भरपूर आहार या सापाचा मुख्य गुणधर्म असून आहाराच्या शोधात जागा निश्चित करून तो दबा धरून बसतो. प्रचंड ताकदीचा हा साप झाडावर, पाण्यात सहजगत्या वावरतो, मात्र खाद्य मिळाल्यानंतर सुस्त आळशी हा स्वभावगुणधर्मामुळे लोकांचे लक्ष वेधून घेणारा आणि गारूड्यांचा आवडता साप म्हणून सर्वत्र परिचित आहे.
पेण वनक्षेत्रात सरीसृपाची मोठी चहेलपेहेल आहे. किंगकोब्रा, नाग, मण्यार, घोणस, धामण यांच्या बरोबरीने अजगरांची संख्याही फार मोठी आहे. सध्या अजगर सापांची फार मोठी वस्ती खाडीकिनारच्या कांदळवनांत आहे.
झाडावर राहणारे हे मोठे साप समुद्र खेकडे, पक्षी, पक्ष्यांची अंडी याबरोबरीने रानडुकरांची छोटी पिल्लेही भक्ष्य म्हणून फडशा पाडतात. बिनविषारी वर्गातील हा साप सध्या भक्ष्य शोधत वाडी - वस्त्यांवरच्या कोंबड्या, बकऱ्यांची पाडस यांना गिळंकृत करण्यासाठी जंगलातून लोकवस्तीच्या दिशेने येतात त्यामुळे सापांच्या वावराच्या ज्ञात असलेल्या लोकवस्तीमध्ये घराच्या परसदारी काटेरी कुंपणाला नायलॉनचे जाळे लावण्याची पध्दत आहे.
(वार्ताहर)

Web Title: 10 gallons of gallows found alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.