लोहगाव विमानतळावर 10 तास खोळंबा
By Admin | Published: February 22, 2017 04:00 PM2017-02-22T16:00:42+5:302017-02-22T16:16:38+5:30
ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 22 : दिल्लीकडे जाणाऱ्या स्पाईस जेट कंपनीच्या विमानाच्या कॉकपीटची काच लोहगाव विमानतळावरच फुटल्याने प्रवाशांचा खोळंबा ...
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 22 : दिल्लीकडे जाणाऱ्या स्पाईस जेट कंपनीच्या विमानाच्या कॉकपीटची काच लोहगाव विमानतळावरच फुटल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी दिल्लीकडे रवाना होण्याची वेळ असुनही अद्यापही विमान विमानतळावरच असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
कंपनीकडून सातत्याने वेळ वाढविला जात असून कोणतीही पर्यायी व्यवस्था केली जात नाही. जवळपास दहा तासांहून अधिक काळ प्रवासी विमानतळावरच असून कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही. लवकरात लवकर विमानाचे दिल्लीकडे प्रस्थान न झाल्यास एकही विमान उडू न देणार नाही, असा पवित्रा प्रवाशांनी घेतला आहे.
विमानतळावर स्पाईस जेट कंपनीची तीन विमाने असून त्यापैकी एकाची काच फुटल्याने दुरूस्ती सुरू आहे, असे प्रवासी शेखर खाकुर्डीकर यांनी सांगितले.
https://www.dailymotion.com/video/x844rys