‘त्या’ हत्याकांडाचा तब्बल १० तास पंचनामा

By admin | Published: March 2, 2016 03:17 AM2016-03-02T03:17:28+5:302016-03-02T03:17:28+5:30

वडवली गावात रविवारी पहाटे झालेले १४ जणांचे हत्याकांड आणि मारेकऱ्याची आत्महत्या याचा पोलीस तब्बल १० तास पंचनामा करीत होते

'That' 10 hours Panchnama for the killings | ‘त्या’ हत्याकांडाचा तब्बल १० तास पंचनामा

‘त्या’ हत्याकांडाचा तब्बल १० तास पंचनामा

Next

जितेेंद्र कालेकर,  ठाणे
वडवली गावात रविवारी पहाटे झालेले १४ जणांचे हत्याकांड आणि मारेकऱ्याची आत्महत्या याचा पोलीस तब्बल १० तास पंचनामा करीत होते. हत्याकांड झालेल्या घरात दिवसभर उग्र वास येत होता. जेमतेम दोन-तीन ग्लास पाणी पिऊन सकाळी ६ ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यत पोलिसांनी पंचनामा पूर्ण केला.
वडवली गावातील हत्याकांडाची माहिती कासारवडवलीच्या सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांना रविवारी पहाटे ४ ते ५ दरम्यान देण्यात आली. त्यानंतर सर्वांच्या साप्ताहिक रजा तातडीने रद्द करण्यात आल्या. जे शनिवारी रात्री ड्युटीवर होते त्यातील ठराविक पोलिसांना पंचनामा करण्यासाठी पाठविण्यात आले.
पंचनामा करताना नोंदी करणाऱ्याचे अक्षर बदलू नये तसेच एकत्रित माहिती मोजक्याच पोलीस कर्मचाऱ्यांकडे रहावी, यासाठी चारजणांचे पथक तयार केले होते. चार ग्रामस्थांच्या मदतीने हा पंचनामा करण्यात आला. कुठल्याही गुन्ह्यातील पंचनामा अर्धा तास ते जास्तीत जास्त ४ ते ५ तास चालतो. एवढा दीर्घकाळ पंचनामा चालण्याची ही त्या पोलिसांच्या कारकीर्दीतील पहिलीच घटना होती. कुर्बानीच्या हुकालाच दिली हसनैनने स्वत:चीही ‘कुर्बानी’१ज्या लोखंडी हुकाला ‘कुर्बानी’चा बकरा लटकवून हसनैन वरेकर त्याची कत्तल करायचा, त्याच हुकाला त्याने स्वत:ला लटकवून घेऊन गळफास घेतला. तत्पूर्वी त्याने कुटुंबातील १४ जणांचे भीषण हत्याकांड घडवले होते.
२या हत्याकांडाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी वरेकर याच्या घराची बारीकसारीक पाहणी केली तेव्हा ही बाब त्यांच्या लक्षात आली. हुसनैनने फास घेताना हुकला दोराच्या दोन गाठी मारल्या. खुर्चीवर उभा राहिला. त्याचवेळी उजव्या हातात सुरा घेतला. खुर्चीला लाथ मारल्यानंतर त्याला फास लागला. सूरा घट्ट पकडलेल्या अवस्थेत तो लटकला होता.
हॉल, किचन आणि बेडरुमध्येही मृतदेह
घराच्या हॉलमध्ये त्याच्या तीन बहिणींसह सात जणांचे मृतदेह होते. हॉलच्या मागे बाथरुम आहे. तर उजव्या बाजूला बेडरुम. बेडरुमला लागूनच किचन. त्यानंतर किचनला लागूनच वर जाण्यासाठी छोटेखानी जिना आहे. याच जिन्याजवळ हसनैनने गळफास घेतला. तर किचनमध्ये त्याच्या पत्नी जबीराचा आणि बाथरुमसमोर मोठी बहीण शबिनाचा मृतदेह होता. आत्महत्या केल्यानंतर पडलेली खर्ची. त्याच्यापासून बहिण आणि पत्नी यांच्या मृतदेहांचे अंतर त्यांची दिशा या सर्व बाबींचा पंचनाम्यात सखोल तपशील आहे. याशिवाय वरच्या मजल्यावरील बेडरुम आणि हॉलमध्ये चौघांचे मृतदेह होते. या सर्व ठिकाणच्या गाद्यांवर अक्षरश: रक्ताचा सडा पडलेला होता.
अहवालाच्या प्रतीक्षेत
मुंबई : क्रौर्याचा कळस गाठणाऱ्या ठाण्यातील सामूहिक हत्याकांड पूर्वनियोजित होते काय, याचा छडा लावण्यासाठी पोलिस न्यायवैद्यक प्रयोशाळेच्या (एफएसएल) अहवालाच्या प्रतीक्षेत आहे. पोलिसांनी या हत्याकांडातील १५ मृतांचे ६० नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविली आहेत. हे अमानुष हत्याकांड घडलेल्या ठिकाणांहून पोलिसांनी हे नमुने गोळा केले होते.
हत्याकांडातील प्रत्येक मृत व्यक्तीचे रक्त, पोट आणि आतड्यांतील पदार्थासह अन्न व औषधीपदार्थाचा (ड्रग) नमुन्यांत समावेश आहे. तथापि, या नमुन्यांचे रासायनिकदृष्ट्या पृथ्व:करण करून यात नेमके कोणते घटक आहेत, हे तपासण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. सर्वप्रथम आम्ही अन्नपदार्थात एखाद्या रासायनिक पदार्थ मिसळण्यात आला होता, याची तपासणी करणार आहोत. अन्नपदार्थात रासायनिक पदार्थ (केमिकल ड्रग) आढळून आल्यास आम्ही हा रासायनिक पदार्थ नेमका काय आहे आणि त्याचे प्रमाण किती आहे, हे तपासण्याची प्रक्रिया हाती घेऊ, असे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हे सर्व नमुने आम्हांला मंगळवारी मिळाली आहेत.
मृतांच्या शरीरातील विविध घटक आणि अन्नपदार्थाच्या नमुन्यात एखादा विशिष्ट रासायनिक पदार्थ (ड्रग) आढळला तरच पोलिसांना होकारार्थी (पॉझिटीव्ह रिपोर्ट) अहवाल सादर केला जाईल. तथापि, या तपासणी प्रक्रियेला खूप वेळ लागतो. अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी प्रत्येक नमुने विशिष्ट उपकरणांत अनेक मिनिटे ठेवावी लागतात. तपासणी अहवाल सादर करण्यात घाई केली जाणार नाही. पूर्ण खात्री होईपर्यंत नमुन्याची तपासणी केली जाईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: 'That' 10 hours Panchnama for the killings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.