दोन अपघातांत १० जखमी
By admin | Published: June 20, 2016 04:07 AM2016-06-20T04:07:39+5:302016-06-20T04:07:39+5:30
नाशिक-मुंबई महामार्गावर दिवसभरात दोन कार अपघातांत १० हून अधिकजण जखमी झाले. चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कसारा : नाशिक-मुंबई महामार्गावर दिवसभरात दोन कार अपघातांत १० हून अधिकजण जखमी झाले. चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
रविवारी सकाळी ८ च्या सुमारास नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या इनोव्हा कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी डिव्हायडरला धडकून उलटली. त्यात कारमधील हार्दिक पटेल, उर्मिला पटेल, रेश्मा पटेल, प्रवीण मकवाना यांच्यासह अन्य काही जण जखमी झाले. जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले.
अपघाताला दोन तास उलटत नाहीत, तोच त्याच ठिकाणी आणखी एका गाडीला अपघात होऊन चौघे जखमी झाले. सर्व जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून, या प्रकरणी पुढील तपास कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रदीप कसबे, हवालदार राठोड खिरारी, पवार करीत आहेत.
नाशिकहून मुंबईकडे येत असताना कसारा घाटाचा उतार व ओहळची वाडी हा नागमोडी वळणांचा रस्ता प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. (वार्ताहर)