चार कोटींचे १० किलो इफेड्रीन हस्तगत

By Admin | Published: April 28, 2016 06:16 AM2016-04-28T06:16:22+5:302016-04-28T06:16:22+5:30

तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने या तिघांचीही रवानगी १४ दिवसांकरिता पोलीस कोठडीत केली.

10 kg of 4 crores of epidrine capture | चार कोटींचे १० किलो इफेड्रीन हस्तगत

चार कोटींचे १० किलो इफेड्रीन हस्तगत

googlenewsNext

ठाणे : देश-विदेशात इफेड्रीन या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. या कंपनीचा मालक तसेच दोन हजार कोटींच्या या व्यवहारातील प्रमुख आरोपी मनोज जैन (४६) , सल्लागार पुनित श्रींगी (४६) आणि मालाचा देशभरात पुरवठा करणारा हरदीपसिंग इंदरसिंग गिल (४२) या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने या तिघांचीही रवानगी १४ दिवसांकरिता पोलीस कोठडीत केली.
ठाणे पोलिसांनी अमली पदार्थाच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा छडा लावल्यामुळे अमेरिकेच्या जस्टीस ड्रग इन्फोर्समेंटचे प्रमुख डेरेक ओडने यांनी सहकाऱ्यांसह ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले. अमली पदार्थांच्या तस्करीचा म्होरक्या विकी गोस्वामी हा केनियात असून त्याला शोधण्यासाठी अमेरिकन पोलीस ठाणे पोलिसांना मदत करतील, असे आश्वासन त्यांनी दिले. अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट समूळ नष्ट करण्यासाठी बरोबरीने काम करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली.
ठाणे पोलिसांनी मुंबईतून अटक केलेला एव्हॉन कंपनीचा संचालक मनोज जैनचे अमेरिकन पोलिसांच्या ड्रग्ज माफीयांच्या यादीत नाव आहे. त्याच्या पासपोर्टची माहितीही त्यांच्याकडे असून ते २०१३ पासून त्याच्या मागावर होते. जैन हाच या सर्व तस्कीतील प्रमुख सूत्रधार असल्याची शक्यताही आता पोलीस आयुक्तांनी वर्तविली आहे. पुनितला अंधेरीतून २६ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. त्याच्याकडे स्वीफ्ट डिझायर मिळाली. कारमध्ये चार कोटींचे १० किलो इफेड्रीनही जप्त केले आहे. यापूर्वी मनोज जैनने चौकशीत अमली पदार्थांच्याबाबत कानावर हात ठेवले होते. परंतु, पुनितला पकडल्यानंतर त्यानेही जैनचेच नाव घेतल्यानंतर त्यालाही २७ एप्रिल रोजी अटक केली. त्यापाठोपाठ मालाची ने - आण करणाऱ्या हरदीपसिंग गिलला नवी मुंबईतून अटक करण्यात आली. तो कळंबोलीतील सेक्टर एक भागात ्नराहत होता. त्याने सोलापूरच्या कंपनीतून एक टन ३०० किलोग्रॅम इफे ड्रीन पावडरचा अहमदाबाद, गुजरात येथील नरेंद्र काचा आणि किशोर राठोड यांना पुरवठा केल्याची कबुली दिली आहे. हा माल संपूर्ण देशभरात वितरीत केल्याचेही त्याने चौकशीत सांगितले. मनोज जैन याने कंपनीतील कच्च्या मालाचा पुरवठादार जयमुखी तसेच किशोर राठोड सोबत केनियात जाऊन आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया विकी गोस्वामीसोबत बैठक केली होती. सोलापूरातील कंपनीतून इफेड्रीन आणि सुडो इफेड्रीनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री करण्याचे त्यामध्ये ठरले होते. त्यापोटी त्यांनी काही रक्कमही घेतली होती. जैनला याआधी २०१४ मध्ये केनियात अटक झाली होती. तेंव्हापासून अमेरिकन अमली पदार्थ विरोधी पथकही त्याच्या मागावर होते.
पुनितसह पाच ते सहाजण आफ्रिकेत या तस्करीसाठी गेल्याचे चौकशीत उघड झाले आहे. २०१३ पासून ही तस्करी सुरु होती. सुमारे १० ते २० टन माल भारताबाहेर गेल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आतापर्यंत यात सागर पोवळे, मयुर सुखदरे, राजेंद्र डिमरी, धानेश्वर स्वामी, पुनित श्रींगी, मनोज जैन आणि हरिदीपसिंग गिल अशा सात जणांना अटक करण्यात आली आहे. तर अजित कामत आणि राजेंद्र कैमल या दोन संचालकांची चौकशी सुरु असून त्यांचाही यात प्रमुख सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. चौकशीत तथ्य आढळल्यास त्यांनाही अटक करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त सिंग यांनी सांगितले.
>प्रशिक्षणही घेतले...
च्किशोर राठोड, नरेंद्र काचा आणि जयमुखी तसेच इतरांनी केनियात जाऊन इफेड्रीन आणि सुडो इफेड्रीन पासून एम्फेटामाईन तसेच मेथएम्फेटामाईन हे अमली पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षणही घेतले होते.
च्त्यानुसार मनोज जैन याने पुनितला सोलापूर येथील कंपनीत प्रमुख संचालक बनवून त्याच्या मार्फत जयमुखी, राठोड आणि काचा यांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया विकी गोस्वामीला इफेड्रीनचा पुरवठा करण्याचे काम सुरु केले होते.
च्त्याच काळात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ठाण्यातून सागर पोवळे आणि मयुर सुखदरे यांना पकडले आणि या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला.
>ममता कुलकर्णी अडचणीत
विकी गोस्वामी हा अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचा पूर्वाश्रमीचा पती असून यापूर्वी ती अमली पदार्थांच्या एका प्रकरणात अडचणीत आली होती. आता पुन्हा तिच्याकडे या प्रकरणाची चौकशी केली जाण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे.
>खराब मालाचा दुरूपयोग : कंपनीने खराब मालाचा साठा नष्ट करणे आवश्यक होते, ते न करता पत्र्याच्या शेडमध्ये ९.५ टन हा माल साठवून ठेवला आणि त्याचा गैरवापर केल्याचे उपायुक्त (औषधे) मनीषा जवंजाळ यांनी सोलापुरात सांगितले. प्रकरण उजेडात आल्यानंतर कंपनीचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत़ आतापर्यंत ते ५६ टक्यांहून अधिक प्रमाणात कोसळले.

Web Title: 10 kg of 4 crores of epidrine capture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.