१० लाखांचा बेकायदा तेलाचा साठा जप्त
By admin | Published: July 12, 2017 04:53 AM2017-07-12T04:53:37+5:302017-07-12T04:53:37+5:30
१० लाख ४४० रु पये किमतीचा मोहरी, तिळाच्या तेलाचा बेकायदा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : बेकायदा खाद्यपदार्थ व खाद्यपदार्थांशी निगडित उत्पादनांना पायबंद घालण्यासाठी, रायगड जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने हाती घेतलेल्या धडक मोहिमेंतर्गत मंगळवारी पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील आरएनपी आॅइल अँड फूड्स प्रा. लि. या कंपनीवर छापा घालून, तब्बल १० लाख ४४० रु पये किमतीचा मोहरी, तिळाच्या तेलाचा बेकायदा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती रायगड अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त दिलीप संगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
रायगड अन्न व औषध प्रशासनाचे अन्न निरीक्षक बालाजी शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तेलाचे नमुने घेऊन ते सरकारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.