लाचखोर अभियंता सावंतकडे सापडली १० लाखांची रोकड
By admin | Published: April 21, 2017 03:04 AM2017-04-21T03:04:42+5:302017-04-21T03:04:42+5:30
तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे लाचखोर कार्यकारी अभियंता सुरेश सावंत यांच्या जळगाव
जळगाव : तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे लाचखोर कार्यकारी अभियंता सुरेश सावंत यांच्या जळगाव, पुणे व सातारा येथील घरांची झडती घेतल्यावर १० लाखांची रोकड सापडली. पहाटे
२ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.
जळगावातील गिरणा या शासकीय निवासस्थानी ५ लाख ८१ हजार ८०० रुपये, पुण्यातील दोन फ्लॅटमध्ये ४ लाख, लॉकरची चावी व काही दागिने आढळून आले आहेत. भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्यासाठी दोन टक्के याप्रमाणे सव्वा चार लाख रुपयांची लाच घेताना सावंत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रात्री रंगेहाथ पकडले. सावंत कार्यकारी अभियंता व महामंडळाचे सदस्य सचिवही आहेत. कार्यकारी संचालक आर.व्ही. पानसे यांची नुकतीच बदली झाली आहे. ही संधी साधत सावंत यांनी दोन टक्के प्रमाणे रक्कम घेऊन फायली मंजूर करण्याचा सपाटा लावला होता.