साहित्य महामंडळांना १० लाखांचे अनुदान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:33 AM2017-10-11T04:33:05+5:302017-10-11T04:33:18+5:30
मराठी भाषा आणि साहित्य विकासाचे कार्य करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळासह इतर सहा प्रादेशिक साहित्य संस्थांच्या अनुदानात दुपटीने वाढ
Next
मुंबई : मराठी भाषा आणि साहित्य विकासाचे कार्य करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळासह इतर सहा प्रादेशिक साहित्य संस्थांच्या अनुदानात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आता या संस्थांना १० लाखांचे अनुदान मिळेल.
मराठी भाषा आणि साहित्य विकासासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या जोडीने पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, विदर्भ साहित्य संघ आणि मराठवाडा साहित्य परिषद या चार घटक संस्था आहेत. शिवाय, कोकण मराठी साहित्य परिषद, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आदींना या वाढीव अनुदान मिळेल.