१० दूध संघांचे सदस्य महानंदच्या निवडणुकीस अपात्र
By admin | Published: February 4, 2016 04:11 AM2016-02-04T04:11:25+5:302016-02-04T04:11:25+5:30
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदच्या संचालक मंडळ निवडीसाठी राज्यातील १० सहकारी दूध संघांच्या सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदच्या संचालक मंडळ निवडीसाठी राज्यातील १० सहकारी दूध संघांच्या सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. संचालक म्हणून निवडून येण्याबरोबरच नियुक्त होण्यास, नामनिर्देशित होण्यास किंवा स्वीकृत सदस्य होण्यासही ते अपात्र असतील. विहित मुदतीत अग्रीमांची परतफेड न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
सहनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) यांनी थकबाकीदार १० दूध संघांना नियमानुसार कारणे दाखवा नोटीस बजावली व सुनावणी घेतली. अग्रीम वेळेत परत न केल्याने संचालक मंडळ निवडीकरीता ते व त्यांचे मतदार प्रतिनिधी निवडून येणाऱ्या नवीन संचालक मंडळावर संचालक म्हणून नियुक्त होण्यास, नामनिर्देशित होण्यास, निवडून येण्यास किंवा स्वीकृत सदस्य होण्यास अपात्र
ठरले आहेत. चाळीसगाव तालुका सहकारी दूध संघाने त्यांच्याकडील थकबाकीची रक्कम भरली असली
तरी हा संघ अंतरिम अवसायनात असल्यामुळे हा संघ व त्याचे
प्रतिनिधी प्रमोद पाटील हे
आता होणाऱ्या महासंघाच्या निवडणुकीत पुन्हा निवडून येण्यास अपात्र ठरले आहेत.
नियमानुसार राज्यातील नोंद झालेले जिल्हा अथवा तालुका दूध संघ किंवा संस्था हेच महासंघाचे सदस्य असू शकतात. त्यामुळे बहुराज्यीय सहकारी दूध संस्था
संघ हे महासंघाचे सदस्य राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनाही निवडणूक प्रक्रियेत भाग घेता येणार नाही.
(विशेष प्रतिनिधी)१) बुलढाणा जिल्हा सहकारी दूध संघ -(३५.९७), २) सोनहिरा तालुका सहकारी दूध संघ, सांगली (१६.६४), ३) शेवगाव तालुका सहकारी दूध संघ, अहमदनगर (३६.८९), ४) नाशिक जिल्हा सहकारी दूध संघ (४९.८८), ५) दूधगंगा तालुका सहकारी दूध संघ, इंदापूर, पुणे (३१.८०), ६) श्रीरामपूर तालुका सहकारी दूध संघ, अहमदनगर (४.४३), ७) चंद्रपूर जिल्हा सहकारी दूध संघ (१३.३४), ८) चाळीसगाव तालुका सहकारी दूध संघ, जळगाव (२.८१), ९) भूम तालुका सहकारी दूध संघ व १०) जालना जिल्हा सहकारी दूध संघ हे दोन्ही संघ अवसायनात गेले आहेत.२