आणखी १० अधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Published: May 6, 2017 03:44 AM2017-05-06T03:44:55+5:302017-05-06T03:44:55+5:30
राज्यातील आणखी १० सहाय्यक पोलीस आयुक्त/उपअधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील आणखी १० सहाय्यक पोलीस आयुक्त/उपअधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
फोर्सवन मुंबईचे उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांची नागपूर ग्रामीणच्या कामठी उपविभागीय अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर मुंबईचे सहाय्यक आयुक्त शीलवंत ढवळे यांची लातूर शहर उपविभागीय अधिकारीपदी, रायगडमधील अलिबागचे उपविभागीय अधिकारी अनिल सारदळ यांची मुंबईत सहायक आयुक्तपदी नियुक्ती केली असून ठाणे शहरचे सहायक आयुक्त नंदकुमार घोरपडे यांची पुणे लोहमार्ग उपविभागीय अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
ठाणे ग्रामीणच्या गणेशपुरीचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांची १ जुलैपासून येथील मुरबाड विभागाचे उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. साताऱ्यातील वाईचे उपविभागीय अधिकारी राजाराम पाटील यांची कोल्हापूर शाहुवाडीच्या उपविभागीय अधिकारीपदावर बदली करण्यात आली आहे. पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाचे गणेश मोरे यांची येथील दौंडच्या उपविभागीय अधिकारी पदावर आणि नाशिकच्या मालेगाव शहरचे उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे यांची मालेगाव ग्रामीण उपविभागीय अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.
तसेच औरगाबाद शहराच्या सहाय्यक आयुक्त रुपाली दरेकर यांची सोलापूर शहराच्या सहाय्यक आयुक्तपदी आणि जळगाव अळमनेरचे उपविभागीय अधिकारी शेख रफीक शेख युसूफ यांची धुळ्यातील शिरपूरच्या उपविभागीय अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
थोरात नंदुरबार उपविभागीय अधिकारी
पोलीस उपअधीक्षकपदावरील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या राजेंद्र साळुंखे यांची अहमदनगरच्या कर्जत उपविभागीय अधिकारीपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर राजलक्ष्मी शिवणकर यांची नांदेड शहर उपविभागीय अधिकारीपदावर आणि अशोक थोरात यांची नंदुरबार उपविभागीय अधिकारी पदावर नेमणूक करण्यात आली आहे.