'महाराष्ट्रातील १० टक्के मतदार मतदानापासून वंचित'; बावनकुळे यांनी निवडणूक आयोगाला दाखविल्या त्रुटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 08:11 PM2024-07-24T20:11:40+5:302024-07-24T20:11:51+5:30

बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रातील बुथ आणि मतदार यादीत असणाऱ्या त्रुटीबद्दल माहिती दिली. २०१९ साली एका मतदारसंघात असणारे दीड लाख मते २०२४च्या लोकसभा निवडणुकीत नव्हती. यासाठी आम्ही नागपूर लोकसभा क्षेत्राचे उदाहरण या निवेदनातून दिले आहे. 

10 percent voters in Maharashtra disenfranchised Errors pointed out by Chandrashekhar Bawankule to Election Commission | 'महाराष्ट्रातील १० टक्के मतदार मतदानापासून वंचित'; बावनकुळे यांनी निवडणूक आयोगाला दाखविल्या त्रुटी

'महाराष्ट्रातील १० टक्के मतदार मतदानापासून वंचित'; बावनकुळे यांनी निवडणूक आयोगाला दाखविल्या त्रुटी

विधानसभा निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार आहेत, या आधी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.  दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काही मागण्या केल्या आहेत. 'विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या मतदार याद्यांतील दोष दूर करावे, अशी विनंती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली. लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी असल्याने महाराष्ट्रातील सुमारे १० टक्के मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिले, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. 

आज २४ जुलै रोजी नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त तसेच प्रदेशाध्यक्ष  बावनकुळे, आमदार आशीष शेलार तसेच माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यात सुमारे सव्वा तास चर्चा झाली. यावेळी बावनकुळे यांनी एक निवेदन त् दिले. 

यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रातील बुथ आणि मतदार यादीत असणाऱ्या त्रुटीबद्दल माहिती दिली. २०१९ साली एका मतदारसंघात असणारे दीड लाख मते २०२४च्या लोकसभा निवडणुकीत नव्हती. यासाठी आम्ही नागपूर लोकसभा क्षेत्राचे उदाहरण या निवेदनातून दिले आहे. 

मतदार यादी करा एक हजारांची

बावनकुळे म्हणाले की, मतदार याद्या तयार करताना डाटा एन्ट्रीच्या परिस्थितीविषयी माहिती दिली. सोबतच एका बुथवरील मतदार यादी एक हजार मतदारांची करावी अशी विनंती केली. सोबतच वयोवृद्ध मतदारांचे वय ८५ वरून ७५ करण्यात यावे तसेच हाऊसिंग सोसायटीमध्ये १०० टक्के बुथ लावण्याची मागणी केली. एकाच इमारतीतील बुथ शेजारी लावण्यात यावे. 

आयुक्तांचे त्रुटीवर लक्ष!

बुथ लेव्हलच्या अधिकाऱ्यांकडून चुका झाल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या लक्षात आल्याचे दिसून आले. फोटो नसल्याने अनेकांना मतदान करता आले नाही, हे देखील त्यांना पटवून दिले. आगामी विधानसभा निवडणूक चांगली होईल व मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता येईल, अशी अपेक्षा चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक आयुक्तांकडे व्यक्त केली.

Web Title: 10 percent voters in Maharashtra disenfranchised Errors pointed out by Chandrashekhar Bawankule to Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.