१० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Published: June 25, 2016 04:09 AM2016-06-25T04:09:18+5:302016-06-25T04:09:18+5:30
राज्य पोलीस दलात सध्या बदल्यांचे सत्र सुरू असून, गृह विभागाने शुक्रवारी १० अधिकाऱ्यांची नव्या ठिकाणी रवानगी केली. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील
मुंबई : राज्य पोलीस दलात सध्या बदल्यांचे सत्र सुरू असून, गृह विभागाने शुक्रवारी १० अधिकाऱ्यांची नव्या ठिकाणी रवानगी केली. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची कोल्हापूरला बदली करण्यात आली असून, अजित पाटील यांना पदोन्नती देऊन नांगरे-पाटील यांच्या जागेवर औरंगाबादला पाठविण्यात आले.
पोलीस अधीक्षक जी. एम. पाटील यांची अहमदनगर येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी (नागरी हक्क संरक्षण), अमोघ गावकर यांची सिंधुदुर्गच्या पोलीस अधीक्षकपदी, सुनील फुलारी यांची राज्य राखीव पोलीस दल क्र.१, पुणे येथे, नागपूरच्या पोलीस उपायुक्त निर्मला देवी यांची नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाच्या पोलीस अधीक्षकपदी, महेश घुर्ये यांची राज्य राखीव पोलीस दल क्र.८च्या (मुंबई) कमांडंटपदी, भारत तांगडे यांची जालना येथील राज्य राखीव पोलीस दल क्र.३ येथे आणि पंजाबराव उगले यांची नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अजित पाटील हे पुणे येथे आर्थिक गुन्हे विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना महानिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. पाटील यांच्याशिवाय कैसर खालीद यांनाही महानिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे.