बुलेट ट्रेनच्या भूसंपादनासाठी १० हजार कोटींची तरतूद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 04:29 AM2018-03-26T04:29:03+5:302018-03-26T04:29:03+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू झाले आहे.

10 thousand crore for the bullet train land acquisition! | बुलेट ट्रेनच्या भूसंपादनासाठी १० हजार कोटींची तरतूद!

बुलेट ट्रेनच्या भूसंपादनासाठी १० हजार कोटींची तरतूद!

googlenewsNext

महेश चेमटे 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू झाले आहे. बाधितांसाठी तब्बल १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आचल खरे यांनी येथे दिली.
महाराष्ट्रातील १०८ बाधित गावांपैकी १७ गावांच्या भूसंपादनास सुरुवात झाली आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
प्रकल्पासाठी ३०० हेक्टरपेक्षा जास्त जमिनीची आवश्यकता आहे. बाधित १०८ गावांपैकी पालघर जिल्ह्यातील ७३, ठाण्यातील ३० आणि मुंबई विभागातील पाच गावांचा समावेश आहे.
संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात भूसंपादन प्रक्रियेत १७ गावांच्या जमिनीचे
नमुना १ प्रसिद्ध करण्यात आले
आहे. रेल्वे प्रकल्पासाठी
वेगवेगळे जमीन हस्तांतरण कायदे अस्तित्वात आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. तर गुजरातमध्ये केंद्रीय कायद्याप्रमाणे भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे.

जमीन मोबदल्यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बाधितांना योग्य आर्थिक मोबदला मिळणार आहे. बाधित कुटुंबांना कुकुट पालन, शेळी पालन आदी व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यात येईल. व्यवसायासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
- आचल खरे, अध्यक्ष, नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोशन

मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन
वेग : ३२० किमी प्रतितास , आसन क्षमता : ७५०
एक ट्रेन : १० बोगींची , २०३३ : १६ बोगीची ट्रेन येणार
महिला, पुरुषांसाठी स्वतंत्र स्वछतागृह आणि शौचालय
दिव्यांग प्रवासी : विशेष शौचालय
बिझनेस आणि स्टँडर्ड क्लास
बिझनेस क्लास : फ्रीजसह अन्य सुविधा
बझनेस क्लास : एक बोगी राखीव
उद्घोषणा सुविधा : मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी
आपत्कालीन व्यवस्था : १० मिनिटांत प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याची सुविधा

आपत्कालीन इंटरकॉम सुविधा

Web Title: 10 thousand crore for the bullet train land acquisition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.