आरटीईअंतर्गत शाळा प्रवेशप्रक्रियेसाठी १०० मदत केंद्रे

By admin | Published: February 27, 2017 04:05 AM2017-02-27T04:05:19+5:302017-02-27T04:05:19+5:30

वंचित घटकांतील बालकांना दर्जेदार शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी आरटीईअंतर्गत २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद शासनामार्फत केली

100 centers for admission to schools under RTE | आरटीईअंतर्गत शाळा प्रवेशप्रक्रियेसाठी १०० मदत केंद्रे

आरटीईअंतर्गत शाळा प्रवेशप्रक्रियेसाठी १०० मदत केंद्रे

Next


ठाणे : समाजातील दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना दर्जेदार शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी आरटीईअंतर्गत २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद शासनामार्फत केली आहे. ही प्रक्रिया आॅनलाइन असल्याने पालकांना अर्ज भरताना अडचणी येऊ नये, म्हणून ठाणे जिल्हा परिषदेने यंदा जिल्ह्यात पहिल्यांदाच १०० मदत केंद्रे सुरू केली आहे. यामध्ये सर्वाधिक मदत केंद्रे ठाणे महापालिका हद्दीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात २०१७ या शैक्षणिक वर्षाकरिता २५ टक्के अंतर्गत प्रवेश प्रक्रि या आॅनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील सहा महापालिका आणि पाच तालुक्यांतदेखील ही प्रवेशप्रक्रि या ९ फेब्रुवारीपासून राबवण्यास सुरु वात झाली आहे. या वेळी पालकांना आपल्या पाल्यांचे आॅनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरताना अनेक अडचणी येत असतात. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शहरी आणि ग्रामीण भागांत १०० ठिकाणी मदत केंद्रे सुरू केली आहे. यामध्ये सर्वाधिक २६ मदत कें द्रे ठाणे महापालिका हद्दीत आहे. त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली १८, नवी मुंबई १४, अंबरनाथ १३, कल्याण ग्रामीण-८, मीरा-भार्इंदर ६, उल्हासनगर ४ तसेच मुरबाड आणि शहापूर येथे प्रत्येकी तीन अशी मदत केंद्रे सुरू केली आहेत. तसेच पालकांना स्वत:ही आपल्या पाल्याचा अर्ज शासनाच्या ँ३३स्र२://२३४ीिल्ल३.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल/ ंेि_स्रङ्म१३ं’/व२ी१२/१३ी्रल्लीि७ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय, संकेतस्थळावरही प्रवेशपत्र शाळांची यादी, रिक्त जागांची संख्या, मदत कें द्रांची यादी व संपर्क क्र मांक तसेच अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहितीदेखील उपलब्ध आहे. विशेष म्हणजे आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरून झाल्यावर कन्फर्म बटणवर क्लिक केल्याशिवाय अर्ज अधिकृत होणार नसल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगितले. (प्रतिनिधी)
>प्रवेशप्रक्रि येत काहीही अडचणी आल्यास पालकांनी संबंधित मनपाचे शिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी व ग्रामीण भागात पं.स. गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
- मीना यादव-शेंडकर, शिक्षणाधिकारी, ठाणे जिल्हा परिषद (प्राथमिक)

Web Title: 100 centers for admission to schools under RTE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.