दुष्काळात एसटीला १00 कोटींची झळ

By admin | Published: July 4, 2016 05:10 AM2016-07-04T05:10:27+5:302016-07-04T05:10:27+5:30

दुष्काळाच्या झळांमुळे दुष्काळग्रस्त भागांतील रहिवाशांनी गेल्या सहा महिन्यांत एसटीने प्रवास करणेच टाळल्याने एसटीचे भारमान घसरले

100 crore worth of relief in the famine | दुष्काळात एसटीला १00 कोटींची झळ

दुष्काळात एसटीला १00 कोटींची झळ

Next


मुंबई : दुष्काळाच्या झळांमुळे दुष्काळग्रस्त भागांतील रहिवाशांनी गेल्या सहा महिन्यांत एसटीने प्रवास करणेच टाळल्याने एसटीचे भारमान घसरले आहे. त्यामुळे महामंडळाला तब्बल १00 कोटींपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले आहे. यातून सावरण्यासाठी एसटी महामंडळाकडून दुष्काळग्रस्त भागांत यापुढे जास्तीतजास्त प्रवासी मिळविण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
पाण्याअभावी त्रस्त झालेल्या अनेकांनी स्थानिक पातळीवरचा आणि लांबचा प्रवास टाळला. याचा फटका एसटी सेवांना बसू लागला. मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात तर एसटीची स्थिती फारच बिकट झाली. बसेस आगार आणि स्थानकांत उभ्याच करून ठेवण्यात येत होत्या. एसटीचे भारमान घटत गेले आणि उत्पन्नावरही त्याचा परिणाम होऊ लागला. जानेवारी ते मार्चदरम्यान दुष्काळामुळे एसटीला ३१ कोटी रुपयांचे नुकसान झाले. एप्रिल महिन्यात लग्नसराईमुळे उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा एसटी महामंडळाला होती. मात्र तसे झाले नाही. एप्रिल ते जूनदरम्यान उत्पन्न तब्बल ८४ कोटी रुपयांनी घटले. एप्रिल ते जून २०१५ या कालावधीशी तुलना केल्यास हे उत्पन्न फारच कमी असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. एकूणच जानेवारी ते जूनदरम्यान एसटीला १00 कोटींपेक्षा जास्त फटका बसला. सहा महिन्यांत एवढा मोठा आर्थिक फटका बसल्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळाकडून आता नव्या उपाययोजना शोधण्यात येत आहेत. ज्या भागात दुष्काळामुळे फटका बसला त्या भागातून जास्तीतजास्त प्रवासी आणि उत्पन्न कसे मिळविता येईल, यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
>लग्नसराईत ३९ कोटी
३0 एप्रिल आणि १ मे या दोन दिवशी लग्नसराई जास्त असल्याने त्याचा फायदा घेत एसटीने जादा वाहतूक केली आणि जवळपास ३९ कोटी ४0 लाखांचे उत्पन्न मिळवले. मात्र मे महिना सुरूहोताच भारमान पुन्हा घसरत गेले. त्यामुळे उत्पन्न मिळवूनही त्याचा फारसा फायदा एसटीला झाला नाही.
दुष्काळामुळे एसटीचे भारमान घसरले आहे आणि मोठा आर्थिक फटकाही बसला आहे. त्यामुळे यापुढे अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
- रणजीतसिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
सुरुवातीच्या तीन महिन्यांत ३१ कोटी रुपये उत्पन्न कमी मिळाल्याने जूनपर्यंत हा आकडा १00 कोटी पार करेल, असा अंदाज एसटी महामंडळाकडून आधीच वर्तविण्यात येत होता.

Web Title: 100 crore worth of relief in the famine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.