ठाण्यात उभा राहणार १०० फुटांचा राष्ट्रध्वज स्तंभ

By admin | Published: May 25, 2017 12:13 AM2017-05-25T00:13:45+5:302017-05-25T00:13:45+5:30

ठाणे महानगरपालिका आणि डी. के. फ्लॅग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरामध्ये ३०.५ मीटर उंचीचा म्हणजेच

100-foot National flag column in Thane | ठाण्यात उभा राहणार १०० फुटांचा राष्ट्रध्वज स्तंभ

ठाण्यात उभा राहणार १०० फुटांचा राष्ट्रध्वज स्तंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महानगरपालिका आणि डी. के. फ्लॅग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरामध्ये ३०.५ मीटर उंचीचा म्हणजेच १०० फुटांचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात येणार असून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी त्याचे लोकार्पण होणार आहे. महापौर मीनाक्षी शिंदे यावेळी अध्यक्षस्थानी असतील.
गोल्डन डाईज नाका येथे हा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात येत असून या ठिकाणी सिंहमुद्रा, पोडियम डिझाईन आदी गोष्टी फाऊंडेशनच्यावतीने तयार करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आवश्यक ते लँडस्केपिंग, परिसर सुशोभिकरण आणि विद्युत व्यवस्था ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.
या समारंभाला खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, डॉ. जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, अ‍ॅड. निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आदी मान्यवरांसह स्थानिक नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
ठाणे जिल्ह्यात उंच राष्ट्रध्वजस्तंभाचा मान नवी मुंबई महापालिकेने मिळवला होता. तेथील राष्ट्रध्वज कायमस्वरूपी फडकत ठेवण्यासाठी विशेष परवानगी घेण्यात आली आहे.

Web Title: 100-foot National flag column in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.