अन्न प्रक्रिया उद्योगात १००% विदेशी गुंतवणूक

By admin | Published: February 17, 2016 03:17 AM2016-02-17T03:17:48+5:302016-02-17T03:17:48+5:30

देशातील शेतकऱ्यांना अन्न प्रक्रिया उद्योगाशी जोडून त्यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी या क्षेत्रात १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला

100% foreign investment in the food processing industry | अन्न प्रक्रिया उद्योगात १००% विदेशी गुंतवणूक

अन्न प्रक्रिया उद्योगात १००% विदेशी गुंतवणूक

Next

मुंबई : देशातील शेतकऱ्यांना अन्न प्रक्रिया उद्योगाशी जोडून त्यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी या क्षेत्रात १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याबाबत आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती केंद्रीय अन्न व औषधी प्रक्रिया मंत्री श्रीमती हरसिमरत कौर बादल यांनी दिली.
‘अन्न प्रक्रिया उद्योग मेक इन इंडिया : अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी’ या विषयावरील परिसंवादात श्रीमती बादल बोलत होत्या.
कृषी आधारित अन्न
प्रक्रिया उद्योगासाठी भारतात मोठ्या प्रमाणात संधी असून याबाबत केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा यासाठी आपण स्वत: आग्रही असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी एकूण ४२ फूड पार्क उभारण्याचे आमचे ध्येय आहे. त्यापैकी ५ उभारण्यात आले असून तिघांचे काम प्रगतीपथावर आहे. पुढील ३० महिन्यांत हे उद्योग सुरु होतील.
या माध्यमातून ५ हजार कोटींची गुंतवणूक आणि प्रत्येक फुड पार्कमुळे २५ ते ३० हजार शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळेल. याशिवाय प्रत्येक फूडपार्कमधून ६ हजार लोकांना रोजगार निर्माण होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: 100% foreign investment in the food processing industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.