एसटीच्या कार्यालयात १०० टक्के ‘अटेंडन्स’!

By admin | Published: July 7, 2016 07:44 PM2016-07-07T19:44:10+5:302016-07-07T19:44:10+5:30

येथील विभागीय कार्यालयातील बहुतांशी अधिकारी, कर्मचारी हे अपडाऊन करीत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच एसटी प्रशासन खडबडून जागे झाले

100 percent attendees in ST's office | एसटीच्या कार्यालयात १०० टक्के ‘अटेंडन्स’!

एसटीच्या कार्यालयात १०० टक्के ‘अटेंडन्स’!

Next

अपडाऊन बंद : कार्यालयीन वेळेत कामचुकारपणा नको
लोकमत इम्पॅक्ट
जालना : येथील विभागीय कार्यालयातील बहुतांशी अधिकारी, कर्मचारी हे अपडाऊन करीत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच एसटी प्रशासन खडबडून जागे झाले. सध्या विभागीय कार्यालयाती १०० टक्के अटेंडन्स पहावयास मिळत असून कार्यालयानी वेळेत कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा विभाग नियंत्रकांनी दिला आहे.
राज्य परिवहन महामंडळातील अनेक अधिकारी हे औरंगाबाद, बीड, मंठा, परतूर आदी ठिकाणाहून अपडाऊन करीत होते. यामुळे कामाची गती मंदावण्याबरोबरच कामे खोळंबली होती. शिवाय हे अधिकारी, कर्मचारी उशिरा येण्याबरोबरच लवकरच कार्यालयातून बाहेर पडत होते. याचा फटका येथील स्थानिकांना बसत होता. कारण ते स्थानिक असल्यामुळे त्यांना जादा वेळ काम करायला भाग पाडले जात असल्याचा आरोप कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी केला होता. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच विभागीय नियंत्रक पी.पी.भुसारी यांनी कार्यालयात वेळेवर येण्याचे आदेश दिले. त्यामुळे कार्यालयात आता पूर्णपणे उपस्थिती जाणवत असल्याने कामात गती आल्याचे सूत्रांनी सांगितले.
क्रॉस चेकींगची कल्पना
अधिकारी, कर्मचारी वेळेवर आले की नाही, याची क्रॉस चेकींग केली जात आहे. एका अधिकाऱ्याने दुसऱ्याच्या विभागातील कर्मचाऱ्यांचे हजेरी रजिस्टर चेक करण्याचे आदेशही नियंत्रक भुसारी यांनी दिले आहेत. त्यामुळे कामचुकारपणा करणाऱ्यांबरोबरच अपडाऊन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: 100 percent attendees in ST's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.