वनविभागात दाखल होणार १०० अत्याधुनिक वाहने
By admin | Published: January 9, 2016 03:59 AM2016-01-09T03:59:07+5:302016-01-09T03:59:07+5:30
जंगलातील वाढते अतिक्रमण, वन्यपशूंच्या संरक्षणाची समस्या गंभीर झाल्याने राज्य शासनाने वनविभाग आणि व्याघ्र प्रकल्पांमध्ये नामांकित कंपनीची १०० अत्याधुनिक वाहने
अमरावती : जंगलातील वाढते अतिक्रमण, वन्यपशूंच्या संरक्षणाची समस्या गंभीर झाल्याने राज्य शासनाने वनविभाग आणि व्याघ्र प्रकल्पांमध्ये नामांकित कंपनीची १०० अत्याधुनिक वाहने आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे भंगार अवस्थेत असलेल्या वाहनांपासून वनाधिकाऱ्यांना मुक्ती मिळणार
आहे.
जंगलात गस्त करणे अथवा वन्यपशूंचे रेस्क्यू आॅपरेशन करण्यासाठी यापूर्वी वनविभागाकडे सुस्थितीतील वाहने नव्हती. मात्र, आता अत्याधुनिक वाहने मागविण्यात येत असल्याने वनकर्मचाऱ्यांना हालचाली करणे सोयीचे होणार आहे.
ही वाहने वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या ताब्यात दिली जाणार आहेत. वाहनांमध्ये जंगल, वन्यपशूंच्या संरक्षणासाठी आवश्यक साहित्य, शस्त्रे असतील.
राज्यातील ११ प्रादेशिक वनविभाग तसेच सहा व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना ही वाहने मिळणार आहेत. या वाहनांचा रंग हिरवा असणार आहे. वाहनांवर निळा दिवा लावण्याची परवानगीसुद्धा देण्यात आली आहे. वनाधिकाऱ्यांच्या वाहनांवर प्रथमच दिवे लावण्याची मुभा मिळाल्याने महसूल, पोलीस प्रशासनाच्या धर्तीवर वनविभागाचा हुद्दा वाढीस लागणार आहे. (प्रतिनिधी)अन्य विभागांच्या तुलनेत वनविभागही मागे राहू नये, यासाठी आधुनिक प्रणालीची वाहने खरेदी करण्यात येत आहेत. वनविभागाचा वाढता व्याप बघता ही वाहने जंगल संरक्षण आणि वन्यपशूंच्या सुरक्षिततेसाठी फायदेशीर ठरतील.
- सुधीर मुनगंटीवार, वने, अर्थमंत्री