एकरी तब्बल १०० टन उसाचे उत्पादन!

By Admin | Published: December 21, 2015 02:22 AM2015-12-21T02:22:17+5:302015-12-21T02:22:17+5:30

उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने, शेतीचा व्यवसाय परवडत नसल्याची ओरड सर्वत्र होत असताना, रिसोड तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने एका एकरात तब्बल

100 tons of sugarcane production! | एकरी तब्बल १०० टन उसाचे उत्पादन!

एकरी तब्बल १०० टन उसाचे उत्पादन!

googlenewsNext

नंदकिशोर नारे,  वाशिम
उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने, शेतीचा व्यवसाय परवडत नसल्याची ओरड सर्वत्र होत असताना, रिसोड तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने एका एकरात तब्बल १०० टन उसाचे उत्पादन घेऊन फायदेशीर शेतीचा यशस्वी प्रयोग केला. १८ हजार रुपये उत्पादन खर्चात या शेतकऱ्याने तब्बल दोन लाखांचे उत्पन्न मिळवले.
ग्राम बेळखेड येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन जिजेबा अवताडे यांच्याकडे चार एकर शेती आहे. ते नेहमीच शेतीत विविध प्रयोग करून भरघोस उत्पादन घेतात.
यावेळी त्यांनी एक एकर शेतात
आठ हजार रुपयांचे बियाणे व खत, तसेच तणनाशकावर दहा हजार रुपये असे १८ हजार रुपये खर्च करून उसाची लागवड केली.
बी-बियाणांचा प्रमाणबद्ध वापर, पुरेसे पाणी आणि पिकाची योग्य निगा यांच्या बळावर त्यांनी उसाचे एकरी १०० टन उत्पादन मिळवले.
सध्या उसाचा दर २००० रुपये प्रतिटन आहेत. त्यामुळे अवताडे यांच्या उसाची सध्याची किंमत
दोन लाखांच्या घरात आहे. त्यांनी उसामध्येच हरभऱ्याचे पीकही घेतले. यासाठी त्यांना पाच हजार रुपये
खर्च आला.
त्यांना १० क्विंटल हरभऱ्याचे उत्पन्न मिळाले आहे. हरभऱ्याचे ४० हजार आणि उसाचे दोन लाख रुपये मिळून एका एकरात त्यांनी २ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले.
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केल्यास आर्थिक विकास निश्चित होईल. नवनवीन धोरण अवलंबून शेतकऱ्यांनी शेतीत प्रयोग करायला हवे.
- गजानन अवताडे,
अल्पभूधारक शेतकरी, बाळखेड,
ता. रिसोड, जि. वाशिम

Web Title: 100 tons of sugarcane production!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.