भामरागडच्या 100 गावांचा संपर्क तुटला
By admin | Published: September 7, 2014 02:11 AM2014-09-07T02:11:30+5:302014-09-07T02:11:30+5:30
अनेक दिवसांच्या खंडानंतर विदर्भातील नागपूर, चंद्रपूर व भंडारा आणि गडचिरोली या चार जिलंमध्ये शनिवारी दुपारी चांगला पाऊस बरसला.
Next
नागपूर : अनेक दिवसांच्या खंडानंतर विदर्भातील नागपूर, चंद्रपूर व भंडारा आणि गडचिरोली या चार जिलंमध्ये शनिवारी दुपारी चांगला पाऊस बरसला. छत्तीसगडमध्ये संततधार पाऊस सुरू असल्याने गडचिरोली जिलत पामुलगौतम, पर्लकोटा नदीची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील 1क्क् गावांचा संपर्क तुटला असून आलापल्ली-भामरागड मार्ग शुक्रवारच्या रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
पामुलगौतम व इंद्रावती नदीही तुडूंब भरून वाहत असल्याने भामरागडला बेटाचे स्वरूप आले आहे. गेल्या 24 तासात गडचिरोली जिलत 18.46 च्या सरासरीने 221.6 मिमी पाऊस झाला आहे. शनिवारच्या सकाळी 8 वाजेर्पयत सर्वाधिक पाऊस भामरागड तालुक्यात 153 मिमी झाला़
नागपूरसह आसपासच्या परिसरात दुपारी एक तास जोरदार पाऊस बरसला. चंद्रपूर शहरासह जिलतील काही भागात शनिवारी दुपारी 1.3क् वाजतापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी 4 वाजतानंतरही पावसाची रिमङिाम सुरूच होती. परिणामी काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाने शेतक:यांना दिलासा मिळाला आहे.
भंडारासह जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये दुपारी 2 वाजताच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. परिणामी पाण्यासाठी चिंतेत असलेल्या शेतक:यांना दिलासा मिळाला आहे. भंडारा, तुसमर,
मोहाडी व पवनी तालुक्यातील काही भागात पाऊस बरसल्याचे वृत्त
आहे.
भंडा:यात मुसळधार पावसाने काही काळासाठी जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील रहदारीला अडथळा निर्माण झाला.(लोकमत न्यूज नेटवर्क)