डीएसकेंवर ठोकला 100 कोटींचा बदनामीचा दावा, जावयाने बदनामीचा केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 09:29 AM2017-12-25T09:29:48+5:302017-12-25T09:30:22+5:30

प्रसिद्ध बांधकाम व्यावसियाक डीएस कुलकर्णींच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

100crore Defamation Case on DSK | डीएसकेंवर ठोकला 100 कोटींचा बदनामीचा दावा, जावयाने बदनामीचा केला आरोप

डीएसकेंवर ठोकला 100 कोटींचा बदनामीचा दावा, जावयाने बदनामीचा केला आरोप

Next

पुणे- प्रसिद्ध बांधकाम व्यावसियाक डीएस कुलकर्णींच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. डीएसकेंवर त्यांचे जावई केदार वांजपे यांनी कोटींचा दावा ठोकला आहे. याची नोटीसही डीएसकेंना पाठवण्यात आली आहे.

डीएस कुलकर्णींनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या भावाचा जावई असलेल्या केदार वांजपेंवर आरोप केले होते. केदार वांजपे आपल्याबद्दल खोटी माहिती पसरवत असल्याचं डीएस कुलकर्णी यांनी म्हंटलं होतं.

माहीती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांना आपल्या आणि आपल्या व्यवसायाबद्दलची माहिती वांजपे पुरवत असल्याचा आरोप डीएसकेंनी केला होता. त्यामुळे केदार वांजपेंनी डीएसकेंवर शंभर कोटींच्या बदनामीचा दावा दाखल केला आहे.
केदार वांजपे हे आधी डीएसकेंबरोबर काम करत होते. ड्रीम सिटीसाठी जागा खरेदी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. पण पुढे डीएसके आणि वांजपेंमधे आर्थिक कारणांवरुन वाद झाला आणि वांजपे 2009 मध्ये डीएसकेंपासून वेगळे झाले.
 

Web Title: 100crore Defamation Case on DSK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.